कौशल्य विकास उपक्रम

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या निर्मितीमुळे महाराष्ट्राची देशात असलेली औद्योगिक आघाडी उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. त्याबरोबरच कुशल मनुष्यबळाची आवश्यकताही भासणार आहे. हे कुशल मनुष्यबळ समृद्धी महामार्गालगतच्या परिसरातच उपलब्ध व्हावे यासाठी स्थानिकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न समृद्धी महामार्ग प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे सुरू आहेत. त्याविषयी

Around 22 interchanges will be constructed along the Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg and around 19 New Towns (Krushi Samruddhi Kendra) will be set up on these interchanges. MSRDC has been appointed as the New Towns Development Authority for the same. The proposed new towns will include agro-based industries, cold storages, godowns, food processing industries as well as industrial and residential areas. The new towns are expected to create large scale employment in the fields of agricultural, infrastructure, tourism, service, manufacturing, repair and maintenance and others. Considering the requirements of the new towns and expressway overall, self-employment opportunities are also expected to be created, for which, skilled human resources will be required on a large scale. On this backdrop, MSRDC has implemented a skill development training programme. The main objective of this initiative is to provide skill development training to the family members of those land owners whose lands have been acquired for the project and make them employment-ready in the future.

बांधकाम कंपन्यांच्या आस्थापनेवर कौशल्य विकास प्रशिक्षण

समृद्धी महामार्गाचे बांधकाम १६ वेगवेगळ्या भागांमध्ये करण्यात येत आहे. त्यासाठी कार्यरत असलेल्या बांधकाम कंपन्यांच्या आस्थापनेवर आजूबाजूच्या गावातील तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील घायगांव-जांबरगांव (ता. वैजापूर) येथील एका बांधकाम कंपनीच्या आस्थापनेवर ३० उमेदवारांनी बहुकुशल तंत्रज्ञ (मल्टीस्किल्ड टेक्निशियन) या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे अभ्यासक्रमाच्या नोट्स व कुशल प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यात आले असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे (एनएसडीसी) मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्यात आले.

skill dev8

उपजिल्हाधिकारी व प्रशासक (नवीन शहरे) अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खान्देश्वर तालुक्यातील प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवित असतांना.

बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दिनेश गीते, उपजिल्हाधिकारी व प्रशासक (नवीन शहरे) यांच्या हस्ते झाले.

महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी अंतर्गत स्टार्टअपला सहाय्य करत आहे

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्याकडून नोंदणीकृत नवउद्योगांची (स्टार्ट-अप) यादी महामंडळाने प्राप्त केली आहे. यादीमध्ये समावेश असलेल्या एका संस्थेला एका खासगी कंपनीच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या जनसेटच्या धुरापासून शाई तयार करून देण्यासाठी सहकार्य केले जात आहे. पोर्टेबल शीतगृह निर्माण करणाऱ्या उद्योगाची माहितीही समृद्धी महामार्ग परिसरातील गावांमध्ये देण्यात येत आहे.

निःशुल्क ऑनलाइन कौशल्य विकास प्रशिक्षण

सध्याच्या टाळेबंदीच्या काळात प्रत्यक्ष प्रशिक्षण बंद असल्यामुळे राज्यातील नामांकित स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने निःशुल्क ऑनलाइन कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाने नोंदणी सुरू केली आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत दहा जिल्ह्यांतून २१६ उमेदवारांनी ऑनलाइन प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे.

श्री. कमलाकर फंड, मुख्य प्रशासक (नवीन शहरे), श्री भरत बस्तेवाड, महाव्यवस्थापक (भूमी) आणि डॉ. विवेक घोडके, एमएसआरडीसीचे उपजिल्हाधिकारी अमरावती येथील विद्याभारती संस्थेला भेट दिली व ड्रायव्हर-कम- मध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. मेकॅनिक प्रशिक्षण कार्यक्रम

औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात औरंगाबाद, अमरावती, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील उमेदवार उपस्थित होते.

शासनाच्या विविध कौशल्य विकास प्रशिक्षण योजनांमध्ये समावेश

राज्य शासनातर्फे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, उद्योजकता विकास कार्यक्रम तर केंद्र सरकारतर्फे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, मिटकॉन तसेच जिल्ह्यातील अग्रणी बँकेतर्फे आर-सेटीमार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
संवादाकांच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग परिसरातील गावांमध्ये संपर्क साधून इच्छुक तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रोत्साहित केले जात आहे. आतापर्यंत १५० प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदवून कौशल्य विकास प्रशिक्षण प्राप्त केले आहे. शासनाच्या विविध कौशल्य विकास प्रशिक्षण योजनांमध्ये समृद्धी महामार्ग परिसरातील इच्छुक तरुण-तरुणींना सहभागी करून घेतल्यामुळे महामंडळाला स्वतःची कौशल्य विकास प्रशिक्षण यंत्रणा निर्माण करण्याची गरज राहिली नाही. समृद्धी महामार्ग परिसरात कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या आधारे रोजगाराच्या संधींची माहिती देण्यासाठी तसेच उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी महामंडळाचे वरिष्ठ अधिका-यांनी विविध कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला आहे.

रोजगार इच्छुकांच्या माहितीचे संकलन

समृद्धी महामार्ग परिसरातील गावांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या सहकार्याने गावाची लोकसंख्या, शाळेतील विद्यार्थी, पारंपरिक व्यवसाय, गावात उपलब्ध संसाधने आणि त्यावर आधारित स्वयंरोजगार यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. तसेच ग्रामरोजगार सेवकांच्या मदतीने समृद्धी महामार्ग परिसरातील १८ ते ४५ वयोगटातील लोकांची माहिती विहित नमुन्यात संकलित करण्यात येत आहे. गावातील सर्व रोजगार इच्छुक यादी तयार करून त्यांना पात्रतेनुसार संधी उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.
प्रस्तावित नवनगरांत बचत गटांच्या स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा महामंडळाचे नियोजन आहे. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ यांचेकडे महामार्ग परिसरातील गावांमध्ये नोंदणी बचत गटांची माहिती त्यांची सदस्यसंख्या आणि उत्पादन यांच्यासह संकलित करण्यात येत आहे.
अमरावती, जालना, वाशीम आणि औरंगाबाद जिल्ह्यातील महिलांच्या बचत गटांची माहिती संकलित करण्यात आली असून इतर जिल्ह्यांतूनही हे काम सुरू आहे. क्रीडा साहित्य निर्मिती, हस्तकलेच्या वस्तू तयार करणे, अन्न आणि फळप्रक्रिया, खेळणी, चामडी वस्तू, आयुर्वेदिक औषधी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्लास्टिक उत्पादने यांसारख्या महत्त्वाकांक्षी क्षेत्रांत बचत गटांची उत्पादने निर्माण करण्यासाठी नियोजन केले जात आहे.

skill dev7

औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळा येथे एल एंड टी कंपनी स्थापन करण्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे तहसीलदार विद्या मुंडे-केंद्रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

औरंगाबाद येथे असिस्टंट फायर ऑपरेटर मॉड्यूलचे प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी.

सूक्ष्म स्वयंरोजगार उद्योगांच्या माहितीचे संकलन

समृद्धी महामार्ग परिसरातील परतावाप्राप्त भूधारकांना कमी गुंतवणूक करून उभारता येतील अशा सूक्ष्म उद्योगांची यादी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे एमएसएमईच्या सहकार्याने संकलित करण्यात येत आहे. त्या अंतर्गत प्रकल्प अहवाल, उद्योगाच्या उभारणीस येणारा एकूण खर्च, कच्च्या मालाची उपलब्धता, निर्माण केलेल्या वस्तूस बाजारपेठ, रोजगार संधी याबाबत अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. परतावाप्राप्त भूधारकांना उद्योजकतेकडे वळवण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.

समृद्धी महामार्ग परिसरातील गावांचे माहिती संकलन

समृद्धी महामार्गाच्या परिसरात १० जिल्यातील ३९२ गावांचा समावेश आहे. स्थानिक शिक्षकांच्या साह्याने गावातील विद्यार्थ्यांची संख्या, पारंपरिक व्यवसाय, स्थानिक संसाधने यांबाबत माहिती संकलित करण्यात येत आहे. वाशीम जिल्ह्यातील ५४ गावांची माहिती संकलित करण्यात आली असून इतर जिल्ह्यांत माहिती संकलित करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येत आहे.