Nagpur-Mumbai Super Communication Expressway Transforming Economic Fortune of Maharashtra

The Maharashtra Samruddhi Mahamarg Project comprises of a total of 5 packages, of which the first package rolls out in the Vidarbha region. Package 5 include Thane district.

Read More

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

समृध्दी महामार्ग ठरणार विदर्भाची भाग्यरेखा मुख्यमंत्र्यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी


अमरावती, दि. 5: विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या महत्वाकांक्षी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरणार आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने समृद्धी आणणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी महामार्गाचे काम येत्या 1 मे पर्यंत पूर्ण होऊन तो प्रत्यक्ष वाहतूकीसाठीही खुला होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी आज समृद्धी महामार्गाच्या विदर्भातील सुमारे 347 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. तसेच त्‍यांनी अमरावती जिल्ह्यातील शिवनी-रसूलापूर येथे सहा किलोमीटर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावरुन प्रवास करुन सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना या रस्त्याचे काम अप्रतिम झाल्याचा अभिप्राय दिला.

नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार विरेंद्र जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव अनिल गायकवाड, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधिक्षक हरी बालाजी उपस्थित होते.

नागपूर- मुंबई शीघ्र संचार दृतगती महामार्ग विदर्भातील चार जिल्ह्यातून जात असून या महामार्गासाठी 8 हजार 364 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे बांधकाम सोळा टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे 60 टक्क्यापेक्षा जास्त रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महामार्गाच्या बांधकामासोबतच जलसंधारणाच्याही कामांना प्राधान्य देण्यात आले असून अमरावती जिल्ह्यातील 38 नाल्यांचे 91 हजार 210 मीटर लांबीचे खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गासोबतच जलसमृद्धी देखील झाली आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, या महामार्गाची कामे लॉकडाऊन काळातही सुरू होती. त्यामुळे या कामामध्ये विलंब झाला नाही. हा महामार्ग देशातील सर्वोत्कृष्ट महामार्ग ठरणार असून नागपूर ते शिर्डी हा मार्ग येत्या 1 मे पर्यंत व त्यानंतर मुंबई पर्यंतचे काम पुढच्या एक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. हा महामार्ग दळणवळणाच्या सर्वोत्कृष्ठ सुविधांसोबतच कृषी व पुरक उद्योगांनाही प्रोत्साहन देणारा ठरणार असल्यामुळे तो राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी रोल मॉडेल ठरेल.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे नागूपर ते मुंबई शिघ्रसंचार दृतगती मार्गापैकी अमरावती जिल्ह्यातून 73.33 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यामध्ये धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील 46 गावांमधून जाणार आहे. 2 हजार 850 कोटी रुपये खर्चून तिसरा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. या महामार्गावर दोन इंटरचेंज प्रस्तावित आहेत.

समृद्धी महामार्ग ठरले हेलीपॅड

अमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या बांधकामाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या हेलीकॉप्टरचे या महामार्गावरच विशेष तयार करण्यात आलेल्या हेलीपॅडवर सकाळी 11.35 वाजता आगमन झाले. श्री. ठाकरे यांचे आगमन होताच पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी वनमंत्री संजय राठोड यांनीही मुख्यमंत्र्यांचेस्वागत केले. स्वागताचा स्वीकार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सहा किलोमीटर प्रवास करुन प्रत्यक्ष पाहणी केली.

नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या बांधकामाबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रकल्प प्रमुख श्रीमती संगीता जयस्वाल यांनी सादरीकरणाद्वारे टप्पा तीनमधील कामाच्या प्रत्यक्ष प्रगतीची माहिती यावेळी सादर केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाच्या बांधकामासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.

समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

औरंगाबाद दि.5: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने अमरावती येथून वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा श्री. ठाकरे यांनी यावेळी गोलवाडी येथे घेतला. त्यानंतर स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली.


गोलवाडी येथे आयोजित समृद्धी महामार्ग आढावा बैठकीत त्यांचे स्वागत रोहयो मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. तसेच यावेळी आमदार सर्वश्री अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, संजय सिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील उपस्थित होते.

या आढाव्याच्यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एलअँडटी कंपनीच्यावतीने समृद्धी महामार्ग पॅकेज 10 बाबत सविस्तर सादरीकरण श्री.ठाकरे यांच्यासमोर करण्यात आले. यामध्ये समृद्धी महामार्गाचा पॅकेज 10 प्रकल्प, प्रकल्पाची 57.90 कि.मी धावपट्टी, सर्व्हिस रोड, छोटे पूल, मोठे पूल, आगामी नियोजन, पॅकेज अंतर्गत या भागातील हरणांना जाण्यासाठी रस्ता, मनुष्यबळ निर्मितीवर भर आदींची सविस्तर तपशीलवार माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनीही यावेळी प्रकल्पाची सद्यस्थितीबाबत माहिती दिली. तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींनी प्रकल्पाच्यासंदर्भातील संदर्भातील प्रश्न मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासमोर मांडले.


या कार्यक्रमास अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार,मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचीही उपस्थिती होती.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पॅकेज 10 अंतर्गत कामांचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत हा प्रकल्प महाराष्ट्र दिनापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या

Read More

The work of Samrudhhi Mahamarg is on a fast track! – Part 6

The construction of Samrudhhi Mahamarg is going on in 16 sections. The section is named as ‘Construction Package’. To maintain the good speed of work and proper work management, a total of 16 construction packages are made, each having around 40 to 45 Kms.

Read More

The work of Samrudhhi Mahamarg is on a fast track! – Part 5

The construction of Samrudhhi Mahamarg is going on in 16 sections. The section is named as ‘Construction Package’. To maintain the good speed of work and proper work management, a total of 16 construction packages are made, each having around 40 to 45 Kms.

Read More

The work of Samrudhhi Mahamarg is on a fast track! – Part 3

he construction of Samrudhhi Mahamarg is going on in 16 sections. The section is named as ‘Construction Package’. To maintain the good speed of work and proper work management, a total of 16 construction packages are made, each having around 40 to 45 Kms.

Read More

The work of Samrudhhi Mahamarg is on a fast track! – Part 4

The construction of Samrudhhi Mahamarg is going on in 16 sections. The section is named as ‘Construction Package’. To maintain the good speed of work and proper work management, a total of 16 construction packages are made, each having around 40 to 45 Kms.

Read More

The work of Samrudhhi Mahamarg is on a fast track! – Part 2

The construction of Samrudhhi Mahamarg is going on in 16 sections. The section is named as ‘Construction Package’. To maintain the good speed of work and proper work management, a total of 16 construction packages are made, each having around 40 to 45 Kms.

Read More

The work of Samrudhhi Mahamarg is on a fast track! – Part 1

The construction of Samrudhhi Mahamarg is going on in 16 sections. The section is named as ‘Construction Package’. To maintain the good speed of work and proper work management, a total of 16 construction packages are made, each having around 40 to 45 Kms.

Read More

Tales of Prosperity of the Beneficiaries: Buldhana Part 1

After willingly consenting to giving their land for the Samruddhi Project, the various landowners from 10 districts executed their land deals with the MSRDC.

Read More