Message from Hon.Co-Chairman

सह -अध्यक्ष्यांचा संदेश

महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे.शेतीमधील उत्पन्न वाढवणं राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आवश्यक आहे. अर्थात हे करण्यासाठी शेतमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देणं, मूल्याधारित सेवा देणं आणि या सगळ्यांमध्ये तंत्रज्ञानाची साथ घेणं महत्वाचं आहे .

" महाराष्ट्र समृद्धी महामार्ग " या प्रकल्पामुळे महामार्गालगतची गावे शहरांना आणि इतर बाजारपेठांचा जोडली जाणार आहे . तसेच इथे विकसित होणाऱ्या कृषी समृद्धी केंद्रामुळे इथल्या शेतीवर आधारित अर्थव्यवस्थेला चांगलीच मदत होणार आहे.

शेतीव्यवस्थेला बळ देण्यासाठी काही महत्वाच्या ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र वसवण्याचा ह्या प्रकल्पात प्रस्ताव आहे. या केंद्रात शेती आणि त्यावर आधारित उद्योग-व्यवसाय असतील . शेतकऱ्यांना इथे त्यांच्या शेतीमालासाठी बाजारपेठ उपलब्ध होईल. शेतीमालाच मूल्य वाढवण्यासाठी इथे शेतीमाल प्रक्रिया केंद्रे असतील शीतगृहे देखील असतील.

मला विश्वास आहे ह्या सर्वामुळे "महाराष्ट्र समृद्धी महामार्ग" हा प्रकल्प महाराष्ट्रातल्या जनतेसाठी प्रगतीची अगणित दरवाजे उघडतील.

श्री.मदन मधुकरराव येरावार ,

सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम), महाराष्ट्र राज्य

सह-अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org