Message from Hon. Chairman

अध्यक्षांचा संदेश

या प्रकल्पांतर्गत तयार होणारा नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अतिशय अद्ययावत तंत्रज्ञानाचा आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी समतुल्य असा महामार्ग असेल. हा महामार्ग जवळजवळ दोन तृतियांश महाराष्ट्राला जोडणार आहे. यामध्ये होणाऱ्या अनेक गोष्टी केवळ राज्यातच नव्हे तर देशात सर्वप्रथम केल्या जाणार आहेत. हा एक अपघात-मुक्त महामार्ग असेल. महामार्गावर आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये विमान उतरू शकेल असा रन-वे इथे असेल. भविष्यात गरज पडली तर हा महामार्ग आतल्या बाजूने वाढवता येईल अशा पद्धतीने त्याची योजना केली जाणार आहे. तसंच जवळची अनेक गावं आणि शहरं या महामार्गाला असंख्य जोडरस्त्यांनी जोडली जातील. त्यामुळे एक निश्चित की अशा या बहुउद्देशीय महामार्गाचा उपयोग महाराष्ट्राला विविध पद्धतीनं होणार आहे.

एव्हढंच नव्हे, तर या रस्त्याच्या सभोवताली अतिशय सुनियोजितपणे काही कृषी समृद्धी केंद्रं वसवली जाणार आहेत. ज्यामुळे तिथल्या स्थानिक रहिवाश्यांना या महामार्गाचा खूपच फायदा होईल. यात विविध उद्योगधंद्यांना चालना तर मिळणार आहेच शिवाय, आसपासच्या भागात प्रगतीच्या बहुविध संधीही निर्माण होणार आहेत. याचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे या प्रकल्पाच्या “जमीन एकत्रीकरणासाठी” आपली जमीन देऊन यात सहभागी होत असलेल्या जमीन मालकांनाही या योजनेचा भरीव फायदा मिळणार आहे.

मला खात्री आहे की महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा हा नवीन प्रकल्प महाराष्ट्राच्या अनेक भागांत समृद्धीचं एक नवं पर्व सुरू करेल.

श्री. एकनाथ शिंदे,

सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम), महाराष्ट्र राज्य

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org