१२ नोव्हेंबर २०१८, सोमवार : नागपूर - मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला 'डिफेन्स इंडस्ट्री कॉरिडॉर' म्हणून घोषित करण्यासंदर्भात राज्य सरकारची रक्षा मंत्रालयाला विनंती

महामार्गाविषयी


राज्याचा सर्वदूर विकास साधण्यासाठी राज्याचा दुर्गम भाग विकसित भागाशी जोडणे..

आणखी वाचा

फायदे


हा महामार्ग आणि त्यासाठी बांधलेले जोडरस्ते यामुळे राज्यातील बरीच प्रेक्षणीय स्थळं एकमेकांना जोडली जातील..

आणखी वाचा

जमीन एकत्रीकरण योजना


जमीनमालकांपुढे सरकारनं दोन पर्याय ठेवले आहेत. एकतर लोकांनी स्वेच्छेनं आपली जमीन या जमीन एकत्रीकरणाला द्यावी..

आणखी वाचा

कन्स्ट्रक्शन पॅकेजेसची माहिती


महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या १६ पॅकेजेसच्या कामासाठी १६ अर्हताप्राप्त कंत्राटदारांची नावे घोषित केली असून प्रत्यक्ष कामाला..

आणखी वाचा

marathi timeline

१८ ऑगस्ट २०१५

मा. मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संबंधित अधिकार्‍यांची भेट घेतली

Read more

२४ सप्टेंबर २०१५

अर्न्स्ट अँड यंग, एलएलपी यांची प्रकल्पाचा व्यवहारिकता अहवाल तयार करण्यासाठी आणि प्राथमिक प्रकल्प प्रस्ताव तयार करण्यासाठी सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली.

Read more

८ ऑक्टोबर २०१५

अर्न्स्ट अँड यंग, एलएलपी ह्यानी रस्त्याचा सध्याचा मार्ग (संरेखन) आणि नवीन संभाव्य मार्ग (Greenfield alignment) एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा कार्यकारी संचालक यांना सादर केले.

Read more

२४ ऑक्टोबर २०१५

मा. मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करून ग्रीनफिल्ड मार्गाची निश्चिती झाली

Read more

१३ नोव्हेंबर २०१५

मा. केंद्रीय मंत्री, रस्ते परिवहन, महामार्ग व जहाजे यांच्यासमोर सादरीकरण झाले

Read more

३० नोव्हेंबर २०१५

पायाभूत सुविधांच्या मंत्रिमंडळ उपसमितीने प्रकल्पास मान्यता दिली. त्या संदर्भात घेतलेले निर्णय:

 • ग्रीनफिल्ड संरेखनाचा स्वीकार
 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नेमणूक; व
 • जमीन एकत्रीकरण (लँड पूलिंग) योजनेचा स्वीकार
Read more

४ मार्च २०१६

राज्याच्या महसूल विभागांवर आधारित पाचही भागांसाठी डीपीआर सल्लागारांची सविस्तर प्रकल्प प्रस्ताव तयार करण्यासाठी नेमणूक झाली

Read more

४ मार्च २०१६

वित्त उभारणीसाठी एसबीआय कॅपिटल मार्केट मर्यादितशी भेट

Read more

१३ एप्रिल २०१६

एशियन डेव्हलपमेंट बँकेबरोबर (एडीबी) भेट

Read more

३० एप्रिल २०१६

संरेखन निश्चिती

Read more

२ मे ते ५ मे २०१६

जमीन एकत्रीकरण (लँड पूलिंग)चं मॉडेल बघण्यासाठी एमएसआरडीसीचे कार्यकारी संचालक व सहव्यवस्थापकीय संचालक यांसह सर्व जेष्ठ अधिकारी, तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अधीक्षक अभियंत्यांची आंध्रप्रदेशच्या राजधानी प्रदेश, ‘अमरावती’ ला भेट

Read more

१८ मे २०१६

मा. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’ वरून मा. मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सर्व जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा

Read more

१८ मे २०१६

फिडबॅक इन्फ्राची नोडल सल्लागार म्हणून नेमणूक

Read more

५ जुलै २०१६

जमीनएकत्रीकरण (लँडपूलिंग) योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता, ह्यासाठीचा शासन निर्णय जारी

Read more

८ जुलै २०१६

‘सह्याद्री’ या शासकीय विश्रामगृहामध्ये मा. मुख्यमंत्र्यांची, एमएसआरडीसी चे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक यांच्याबरोबर आमदार आणि खासदारांसमोर मांडणी

Read more

२२ ऑगस्ट २०१६

महाराष्ट्र सरकारचा शासकीय राजपत्रामध्ये २०१६ चा महाराष्ट्र महामार्ग (सुधारित) कायदा प्रकाशित

Read more

२५ ऑगस्ट २०१६

‘सह्याद्री’ या शासकीय विश्रामगृहामध्ये मा. मुख्यमंत्र्यांची मुंबईस्थित संपादकांसोबत बैठक

Read more

१ सप्टेंबर २०१६

सुधारित महाराष्ट्र महामार्ग कायद्याची अंमलबजावणी सुरु

Read more

७ सप्टेंबर २०१६

संरेखनाला मान्यता, संरेखना शासकीय राजपत्रामध्ये प्रसिद्ध

Read more

१२ सप्टेंबर २०१६

‘सह्याद्री’ या शासकीय विश्रामगृहामध्ये मा. मुख्यमंत्र्यांची सर्व स्थानिक वृत्तपत्रांच्या जेष्ठ संपादकांशी भेट

Read more

१३ सप्टेंबर २०१६

जमीन एकत्रीकरण योजनेची सूचना जनतेसाठी प्रसिद्ध करण्यात आली

Read more

१० नोव्हेंबर २०१६

महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र महामार्ग (सुधारित) कायदा, २०१६ चे नियम प्रकाशित

Read more

२७ डिसेंबर २०१६

सर्व विभागांच्या सल्लागारांनी त्यांच्या विभागाचे ‘व्यवहारिकता अहवाल’ केले सादर

Read more

४ जानेवारी २०१७

लॅंडपूलिंग योजनेत हंगामी पिकांची जमीन समाविष्ट करण्याविषयीचा शासन आदेश जाहीर

Read more

१४ मार्च २०१७

महाराष्ट्र शासनाने खासगी जमीन खासगीरित्या बोलणी करून थेट विकत घेता येईल असा निर्णय घेतला

Read more

२८ एप्रिल २०१७

जमिनीच्या थेट खरेदी योजनेबद्दल सूचना देण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली

Read more

२५ मे २०१७

कायदेशीर बाबींसाठी वकिलाची नेमणूक करण्यात आली

Read more

३१ मे २०१७

एकत्रित जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली

Read more

०१ जून २०१७

जमिनीची तपशीलवार माहिती मिळण्यासाठीच्या आवश्यक प्रक्रियेला सुरवात झाली

Read more

०१ जून २०१७

प्रस्ताव मागविण्याच्या आणि कामाला लागणाऱ्या खर्चाचा अंदाज मागविण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली.

Read more

५ जुलै २०१७

जमिनीच्या प्रकारानुरूप गावातील जमिनींचे भाव जिल्हास्तरीय समितीने महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पांतर्गत जाहीर केले.

Read more

११जुलै २०१७

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी उपयोगात येणाऱ्या जमिनींसाठीचे खरेदी व्यवहार करण्यासाठी १०० कोटी रुपये रक्कम प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आली आहे.

Read more

१३ जुलै २०१७

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठीची जमीन खरेदी प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरु केली. नागपूर मधील हिंगणा तालुक्यात या जमीन खरेदी प्रक्रियेचा शुभारंभ झाला.

Read more

१५ जुलै २०१७

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठीची जमीन खरेदी प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ठाणे जिल्ह्यात यशस्वीपणे सुरु केली.

Read more

२० जुलै २०१७

जालना जिल्ह्यात ही "समृद्धी" साठी जमीन खरेदी प्रक्रिया सुरू झाली. जालना तालुक्यातील ८८ आर. ५२ स्क्वेअर फूट जमीन महामंडळाने खरेदी केली आहे. या प्रक्रियेनंतर लाभार्थ्यांच्या खात्यात ३९ लाख ९६ हजार २१२ रुपये जमा करण्यात आले.

Read more

२० जुलै २०१७

बुलडाणा जिल्ह्यात ही "समृद्धी" साठी जमीन खरेदी प्रक्रिया सुरु. लोणार तालुक्यातील १.५ हेक्टर जमीन महामंडळाने खरेदी केली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात ९२ लाख ३८ हजार ३७४ रुपये जमा करण्यात आले.

Read more

२२ जुलै २०१७

वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यात एकूण २.२७ हेक्टर जमीन खरेदी चा व्यवहार पूर्ण झाला. ७० लाख ७२ हजार १६२ रुपये मोबदला यावेळी लाभार्थ्यांना देण्यात आला.

Read more

२५ जुलै २०१७

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात समृद्धी महामार्गासाठीची जमीन खरेदी प्रक्रिया सुरु झाली. ३१ लाख ५५ हजार रुपयांचा मोबदला ३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.

Read more

२९जुलै २०१७

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावात 'समृद्धी'साठी जमीन खरेदी सुरू झाली. ७८ लाख २४ हजार ८५२ रुपयाांचा मोबदला आर.टी. जी. एस प्रक्रियेद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.

Read more

२९जुलै २०१७

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर तालुक्यात 'समृद्धी'साठी जमीन खरेदीला सुरवात... शेतकऱ्यांना यानंतर आर. टी.जी.एस प्रक्रियेद्वारे १२ कोटी ७१ लाख रुपयांचा मोबदला देेण्यात आला.

Read more

२९ जुलै २०१७

महाराष्ट्र समृद्धी महामार्गामध्ये येणाऱ्या सर्व १० जिल्ह्यांमध्ये जमीन खरेदीला यशस्वीपणे सुरुवात झाली.

Read more

३१ ऑगस्ट २०१७

एम.आय.डी.सी कडून १ हजार ५०० कोटी रुपये महामंडळाला महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी मंजूर झाले आहेत.

Read more

३१ ऑगस्ट २०१७

म्हाडाकडून १ हजार कोटी रुपये महामंडळाला महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी मंजूर झाले आहेत.

Read more

३१ ऑगस्ट २०१७

एस.आर.ए कडून १ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य महामंडळाला महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी मंजूर झाले आहेत.

Read more

३१ ऑगस्ट २०१७

एम.एम.आर.डी.ए कडून १ हजार कोटी रुपये महामंडळाला महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या कामासाठी मंजूर झाले आहेत.

Read more

३१ ऑगस्ट २०१७

सिडकोकडून १ हजार कोटी रुपये महामंडळाला अर्थसहाय्य स्वरूपात महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी मंजूर झाले आहेत.

Read more

३१ ऑक्टोबर २०१७

समृद्धी प्रकल्पांतर्गत ३१ ऑक्टोबर २०१७ पर्यंत २८५१ लाभार्थ्यांना मिळाला ६३० कोटी रुपयांचा मोबदला.

Read more

४ डिसेंबर २०१७

४ डिसेंबर २०१७ पर्यंत एकूण २४५७ हेक्टर जमीन समृद्धी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. या प्रक्रियेद्वारे ३९८५ खरेदीखतांवर स्वाक्षऱ्या झाल्या आणि ६१७९ लाभार्थ्यांना त्वरित मोबदला देण्यात आला.

Read more

१ जानेवारी २०१८

नागपूर - मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे लिमिटेड या नावाने 'समृद्धी' प्रकल्पासाठी विशेष उद्देश वाहन कंपनी स्थापन

Read more

१५ जानेवारी २०१८

नागपूर - मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे लिमिटेड या नावाने 'समृद्धी' प्रकल्पासाठी विशेष उद्देश वाहन कंपनी स्थापन

Read more

२३ जानेवारी २०१८

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'समृद्धी' प्रकल्पाचा आराखडा सादर केला.

Read more

१८ फेब्रुवारी २०१८

मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ मध्ये महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाने सहभाग घेतला आहे. उदघाटनप्रसंगी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि विविध गुंतवणूकदारांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या स्टॉलला भेट देऊन प्रकल्पाच्या प्रगतीविषयी माहिती जाणून घेतली.

Read more

१० एप्रिल २०१८

१० एप्रिल २०१८ पर्यंत महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी ७५% जमीनीची खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

Read more

२३ एप्रिल २०१८

नगर विकास विभाग अधिसूचना 10 ठिकाणी नवनगर निर्मिती साठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास नवनगर विकास प्राधिकरण म्हणून घोषित करणेबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 113 ( 3 a ) अन्वये अधिसूचना प्रसिद्ध झाली

Read more

२३ एप्रिल २०१८

त्यानुसार यापूवीचे 7नवनगरे विचारात घेता एकुण 17 नवनगरे ( कृषी समृद्धी केंद्रे ) विकसित करण्यात येणार आहेत.

Read more

२६ एप्रिल २०१८

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७ भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ यामधे सुधारणा .त्यानुसार महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 नुसार संपादन करण्यास मुभा.

Read more

२९ मे २०१८

प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी राज्य शासन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे लिमिटेड यांच्यामध्ये होणाऱ्या करारनाम्याला राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे.

Read more

३१ मे २०१८

'समृद्धी'साठी १३ अर्हता प्राप्त कंत्राटदारांची नावे जाहीर...

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी कमीत कमी बोली लावणाऱ्या (एल -१) अर्हताप्राप्त १३ कंत्राटदारांची नावे आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे जाहीर करण्यात आली.

Read more

१३ जुन २०१८

समृद्धी प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण जमिनीपैकी ८० % जमिनीची सरळ खरेदी पूर्ण. ५०२७ कोटी रुपयाचे लाभार्थ्यांना वाटप.

Read more

१ जुलै २०१८

समृद्धी प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण जमिनीपैकी ८५ % जमिनीची सरळ खरेदी पूर्ण. ५२९४ कोटी रुपयाचे लाभार्थ्यांना वाटप.

Read more

७ ऑगस्ट २०१८

कलम १८ (१) प्रमाणे महामार्गाच्या जमीन संपादनाची अधिसूचना प्रसिध्द झाली.
संमतीपत्र देण्यासाठीची अंतीम मुदत २९ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे .

Read more

२२ सप्टेंबर २०१८

महामार्गावर मिळणार वन्यजीवांना अभय ,त्यांच्या रक्षणासाठी महामंडळाचा भारतीय वन्यजीव संस्थेशी सामंजस्य करार.

Read more

२८ सप्टेंबर २०१८

राष्ट्रीय वन्यजीव संस्थेने इको सेन्सेटिव्ह झोन मधून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी हिरवा कंदील दिला आहे.

Read more

११ ऑक्टोबर २०१८

राष्ट्रीय वन्यजीव संस्थेने समृद्धी महामार्गासाठी संमती देताना काही उपाय सुचवले आहेत . या उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी महामंडळ पुढाकार घेणार आहे.

Read more

१ नोव्हेंबर २०१८

कौटुंबिक वादामुळे प्रलंबित जमिनीच्या खरेदीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांची बैठक नुकतीच घेतली आहे

Read more

३ नोव्हेंबर २०१८

महामार्गाच्या उभारणीसाठी ज्या शेत शिवारातून माती व मुरूम घेतले जाणार आहे त्या ठिकाणी शेततळ्यांची निर्मिती केली जाणार आहे . यासाठी ज्यांची जमीन उपयोगात आणली जाईल त्यांना योग्य मोबदला मिळणार आहे.

Read more

२८ नोव्हेंबर २०१८

शासनाच्या पुढाकाराने ३ महिन्यात शेतकऱ्यांच्या सोयीनुसार निवाडे प्रक्रिया पूर्ण केली.

Read more

२२ डिसेंबर २०१८

MIDC तर्फे २५० कोटी रुपयांचा धनादेश MSRDC कडे सुपूर्द करण्यात आला आहे.

Read more

१० जानेवारी २०१९

समृद्धी महामार्गाच्या बांधणीची पूर्वतयारी प्रगतीपथावर

Read more

१४ जानेवारी २०१९

प्रारंभिक अधिसुचना नवनगरे ता. वैजापूर जि. औरंगाबाद दि. १४-१-२०१९

Read more

१५ फेब्रुवारी २०१९

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबल गट (Task Force) स्थापन करणेबाबत अधिसूचना जाहीर.

Read more

१५ फेब्रुवारी २०१९

नवनगरांकरिता उपविभागीय अधिकारी (महसूल), उपविभाग वैजापूर, जिल्हा औरंगाबाद यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबत अधिसूचना जाहीर

Read more

१६ जुलै २०१९

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी ४००० करोड रुपयांच्या बँक गॅरंटीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मंजुरी

Read more

मा. मुख्यमंत्र्यांचा संदेश

देशातलं सर्वात प्रगत राज्य या नात्यानं महाराष्ट्रानं आजपर्यंत देशाचं नेतृत्व केलं आहे. मात्र तरीही हे मान्य केलं पाहिजे की राज्याचा विकास सर्वत्र सारखा झालेला नाही आणि त्यामुळे राज्यात एक प्रकारचा प्रादेशिक असमतोल तयार झाला आहे. या राज्याचा मुख्यमंत्री या नात्यानं या असमतोलाकडे मी एक आव्हान म्हणून पाहतो आहे. म्हणूनच माझ्या कार्यकाळात या परिस्थितीत बदल करण्याची माझी इच्छा आहे.

राज्याचे नागरिक स्वबळावर आपली प्रगती करू शकतील यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणं हे शासनाचं महत्वाचे काम आहे.

आणखी वाचा

कृषी समृद्धी केद्रांची वैशिष्ट्ये

छायाचित्रे

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा एक जलद परिवहनाशी संबंधित पायाभूत सुविधांसाठीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि हिवाळी राजधानी नागपूर ही दोन प्रमुख शहरं अत्याधुनिक द्रुतगती मार्गाने जोडली जाणार आहेत. या प्रकल्पात २० हून अधिक कृषी समृद्धी केंद्रंही विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

या प्रकल्पात २ मुख्य गोष्टी आहेत -

 • महाराष्ट्रातील दूरवरच्या व दुर्गम भागांना मुंबईतील बंदराशी आणि नागपूरच्या बहुउद्देशीय कार्गो हबशी जोडणारा आणि नागपूर आणि मुंबईमध्ये जलद संपर्क निर्माण करणारा महामार्ग.
 • अशी कृषी समृद्धी केंद्रे जी कृषी आधारित उद्योगांना चालना देतील, जी व्यापार केंद्र बनतील आणि जिथे निवासी क्षेत्रही असेल व या निवासी क्षेत्रामध्ये सर्व सोयीसुविधा असतील. अशा प्रकारची समृद्धी केंद्रे जिथे हा महामार्ग अन्य राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गांना मिळतो त्या लगतच्या परिसरात विकसित केली जातील.

आकडेवारी

कृषी समृद्धी केंद्र

शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग

हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या १० जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये एकमेकांशी जोडलेले अंतर्गत जोडरस्ते देखील असणार आहेत. ज्यामुळे या मार्गावरील सर्व महत्त्वाची शहरं आणि प्रेक्षणीय स्थळं एकमेकांना जोडली जातील. यामुळे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या १४ जिल्ह्यांनाही या मार्गाशी जोडले जाईल. म्हणजेच राज्यातले एकूण २४ जिल्हे या द्रुतगती महामार्गामुळे एकमेकांशी जोडले जातील.

या बरोबरच या महामार्गावर, काही महत्त्वाच्या ठिकाणी, म्हणजे जिथे या महामार्गाला राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग छेदून जातो अशा ठिकाणी २० हून अधिक कृषी समृद्धी केंद्रे विकसित करण्याचे नियोजन आहे

या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च अंदाजे रु. ४६,००० कोटींच्या आसपास आहे.

आणखी वाचा

Facebook Social Share

Google Plus Share

 

mr

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org