सर्च रिपोर्ट : जमीन खरेदीमधील महत्वाचा टप्पा

महाराष्ट्र समृद्धी महामार्गात आपली जमीन खरेदी करून देताना सर्च रिपोर्ट म्हणजेच शोध अहवाल पूर्ण असणे गरजेचे असते. या सर्च रिपोर्टमागील संकल्पना आणि त्याचे महत्व काय आहे ? याविषयी..

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या अंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या जमिनींबाबत व्यवहारानंतर कुठलेही प्रश्न उद्भवू नये यासाठी संबंधित जमिनीचा सर्च रिपोर्ट म्हणजे शोध अहवाल पूर्ण असणे आवश्यक असते. समृद्धी महामार्गासाठी जमिनींची खरेदी करताना संबंधित जमिनीचा शोध अहवाल पूर्ण आहे का नाही ? नसल्यास तो पूर्ण करणे यासारखी कामे करण्यासाठी महामंडळातर्फे विशेष वकिलांची नियुक्ती करण्यात आली होती. हे वकील भूधारकांना विश्वासात घेऊन हा शोध अहवाल तयार करण्यासाठी मदत करत होते. संबंधित जमीन आत्ता कोणाच्या नावावर आहे , पूर्वी कोणाच्या नावावर होती ? यासारखा मागील सुमारे ५० वर्षांपूर्वीचा इतिहास यामध्ये तपासला जातो. मागील ५० वर्षात संबंधित जमिनीचे मालक कोण होते. पूर्वी त्या जमिनीचे कुठले व्यवहार पार पडले आहेत का ? यासारख्या सर्व नोंदी सर्च रिपोर्टमध्ये सापडतात. जमीन खरेदीआधी या सर्व बाबी तपासल्या  गेल्यामुळे जमिनीची खरेदी सुलभ होते. 

या प्रकल्पासंबंधित जमिनीची खरेदी करण्यापूर्वी अनेक भूधारकांच्या जमिनीविषयक काही नोंदी केलेल्या नव्हत्या किंवा योग्य पद्धतीने नोंदवलेल्या नव्हत्या. हे लक्षात आल्यावर अशा भूधारकांना ग्रामसंवादकांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले व महामंडळाने नियुक्त केलेल्या वकिलांचा सल्ला घेण्यासाठी सांगण्यात आले. अनेक भूधारकांनी मग यानंतर वकिलांच्या मदतीने सर्च रिपोर्ट पूर्ण करून जमिनीची खरेदी करून दिली. 

यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आपण चित्रफीत पाहू शकता. https://www.youtube.com/watch?v=NInWWDR6-4c&t=161s

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

  • Maharashtra State Road Development Corporation Ltd
    Napean Sea Road, Priyadarshini Park,
    Mumbai 400 036, Maharashtra, India.
  • 91 22 23685909,
    91 22 26517900,
    Fax: 91 22 26417893.
  • info@msrdc.org