सरळ खरेदीचा 'अनुभव'

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी ज्या भूधारकांच्या जमिनी उपयोगात येणार आहेत अशा भूधारकांसोबत जमीन व्यवहार पूर्ण करून तात्काळ पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. महामंडळासोबत सरळ खरेदी व्यवहार करण्याचा अनुभव लाभार्थ्यांना कसा आला याविषयी अनेक लाभार्थ्यांनी पुढे येत आपले अनुभव सांगितले. त्याविषयी...

पूर्वी सामान्य लोकांच्या मनात त्यांच्या पूर्वानुभवानुसार प्रशासनाची अकार्यक्षम आणि वेळ खाऊ अशी एक प्रतिमा निर्माण झाली होती. मात्र महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा विचार केला तर हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रशासकीय कारभाराचा पूर्व अनुभव चांगला नसल्याने लोकांनी अपुऱ्या माहितीअभावी प्रकल्पाला आपापल्यापरीने विरोध केला मात्र प्रकल्पाची योग्य व अचूक माहिती समजल्यानंतर लोकांचा विरोध मावळला. जमीन खरेदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आपणांस तात्काळ मोबदला मिळेल असा विश्वास भूधारकांच्या मनात तयार झाल्यानंतर जमीन खरेदी प्रक्रियेने वेग घेतला. एकरकमी मोबदला त्वरित खात्यात जमा झाल्याचे कळताच लोक स्वतःहून पुढे येत आपला अनुभव कथन करू लागले.

टप्प्याटप्प्याने प्रशासनाने लोकांना विश्वासात घेऊन खालीलप्रकारे भूधारकांना संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मदत केली.

  • १) महामार्गात भूधारकांची किती जमीन येते, संयुक्त जमीन मोजणी कशी होते आणि जमिनीचे मूल्यांकन व इतर गोष्टींचे मूल्यांकन कसे करतात हे सर्व महामंडळाने त्यांच्या ग्राम संवादकामार्फत प्रत्येक भूधारकास सांगितले.
  • २) भूधारकांना जमिनीचा मोबदला किती मिळणार, त्यांच्या जमिनीच्या मालकीविषयीची विशेष माहिती व पुरावे कसे उपलब्ध करायचे याविषयी महामंडळाने सहकार्य केले.
  • ३) शासकीय कार्यालयातील अधिकारी वर्ग व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी खरेदी व्यवहाराच्या प्रत्येक प्रलंबित कामावर लक्ष ठेवून ते पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील होते.
  • ४) महामंडळ नियुक्त ग्राम संवादकामार्फत सहसंमतीधारकांना खरेदी देण्यासाठी संपूर्ण सुसज्ज करतात. त्वरित मोबदला देण्यासाठी शासकीय अधिकारी प्रयत्न करतात.

भूधारकांच्या गाठीशी प्रशासकीय कामाचा आलेला हा चांगला अनुभव त्यांनी केवळ आपल्याजवळ न ठेवता लोकांनाही सांगितला. अशाच एका समृद्ध लाभार्थ्याची प्रातिनिधिक गोष्ट पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=_QUsgTGk_Uk&t=61s

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

  • Maharashtra State Road Development Corporation Ltd
    Napean Sea Road, Priyadarshini Park,
    Mumbai 400 036, Maharashtra, India.
  • 91 22 23685909,
    91 22 26517900,
    Fax: 91 22 26417893.
  • info@msrdc.org