समृद्ध लाभार्थ्यांची गोष्ट : वाशिम भाग २

१० जिल्ह्यातील जमीन धारकांनी महामंडळासोबत सरळ खरेदी व्यवहार केला. आर.टी. जी. एस द्वारे पैसे बँकेतील खात्यात जमा झाल्यानंतर तो पैसा त्यांनी कुठे व कसा वापरला हे सांगणारी वाशिममधील अशाच काही समृद्ध लाभार्थ्यांची गोष्ट दोन भागात..
त्यातील हा दुसरा आणि शेवटचा भाग..

वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यातील  पेडगावमधील  आशाबाई वैद्य आणि कारंजा तालुक्यातील निंबा जहागीर गावातील उगले बंधू समृद्धीप्रकल्पातील अनेक लाभार्थ्यांपैकी दोन भूधारक लाभार्थी!

आशाबाई वैद्य यांची पेडगावमध्ये शेतजमीन होती. आशाबाई वैद्य यांचे कुटुंब दहा जणांचे. त्यांचे शेत फार काही मोठे नाही. मात्र, त्यात त्या इतरांसारखेच पीक-पाणी घेत. परंतु सर्व शेती पावसावरच अवलंबून असल्याने फारसे काही उत्पन्न हाती लागत नव्हते. त्यातच समृद्धी महामार्ग प्रकल्पाबाबत माहिती कळताच त्यांना आपल्या जमिनीची काळजी वाटू लागली. आपली जमीन महामार्गात गेल्यानंतर कुटुंबाची गुजराण कशी होईल, ही चिंता त्यांना सतावू लागली. त्यामुळेच त्यांनी सुरुवातीला प्रकल्पाला विरोध केला. परंतु जमिनीच्या बदल्यात मिळणारी रक्कम पाचपट आहे तसेच पैसे मिळायला विलंब लागणार नसल्याचे कळताच आशाबाईंनी प्रकल्पाबाबत सकारात्मक विचार करायला सुरुवात केली. त्यांनी कुटुंबातील सगळ्यांना विश्वासात घेऊन प्रकल्पाची माहिती दिली. किती जमीन जाणार आहे, त्याचे पैसे किती मिळणार आहेत याबाबत कुटुंबामध्ये चर्चा झाली.  

आशाबाईंची ८९ आर आकाराची जमीन महामार्ग प्रकल्पाच्या उपयोगात येणार होती.   जमिनीचा खरेदी व्यवहार झाल्यानंतर साधारणतः दोन दिवसांत आशाबाईंच्या खात्यात पैसे जमा झाले. पैसे जमा झाल्यानंतर आशाबाईंनी गावानजीकच दोन एकर शेतजमीन घेतली. तसेच घराचे नव्याने बांधकामही सुरु केले. भविष्याचा विचार करून काही पैसे बँकेत ठेवले.

आशाबाईंच्या शेतात पाण्याची टंचाई होती. त्यामुळेच आपल्या शेतापर्यंत पाणी आणण्यासाठी त्यांना जलवाहिनी टाकायची होती. त्यासाठीही त्यांनी काही रकमेची तरतूद आता केली आहे. यामुळे आशाबाईंना आता चिंता नाही. शेतात पाणी आणून ती बागायती केली की उत्पन्नात आपोआप भर होईल, असा त्यांना विश्वास आहे. म्हणूनच त्यांनी तातडीने हे काम हाती घेण्याचे ठरवले आहे. 

आशाबाईंप्रमाणेच  उगले बंधूंचे कुटुंब म्हणजे वाशिममधील आणखी एक लाभार्थी कुटुंब ! 

निंबा जहांगीर गावानजीकच उगले बंधूत्रयीची एकूण दहा एकर शेती आहे. आधी कोरडवाहू असलेली शेती या तीनही भावांनी अपार कष्ट करून ती ओलिताखाली आणली. आता शेतात विहीर, पाइपलाइन, विंधण विहीर सर्व आहे. तीनही भाऊ शेतीत राबतात. एका वर्षात दोनदा पीक घेतात. एका हंगामात तूर आणि सोयाबीन आणि नंतरच्या हंगामात गहू आणि हरभरा ही ती पिके. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्नही मजबूत, म्हणजे चार-साडेचार लाख रुपये. त्यातच बागायती म्हणूनही शेती विकसित केलेली. शेतातील एका पट्ट्यात आंब्याची झाडे लावलेली आहेत. एकूण उगले बंधूंच्या कष्टाची फळे शेतात दिसू लागली होती. आणि हे सर्व गेल्या आठ-दहा वर्षांत त्यांनी एकत्र येऊन केले होते. समृद्धी महामार्ग प्रकल्पाबाबत जेव्हा गावात समजले त्यावेळी इतरांप्रमाणेच या तीनही भावांनी विरोध सुरू केला. कारण गावापासून फार काही अंतरावर नसलेल्या नागपूर-जालना महामार्गात आणि धरण प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यातील काही जण उगले यांचे आप्तस्वकीय. त्यांना अगदी अलीकडच्या काळापर्यंत त्यांच्या जमिनीचे पैसे मिळालेले नव्हते. त्यामुळेच मग समृद्धी महामार्गात जमीन जाणार असेल तर तुम्हाला कैक वर्षे मोबदल्यासाठी वाट पाहावी लागेल असा त्यांचा अंदाज होता. 

समृद्धी महामार्गात त्यांची दहापैकी सहा एकर जमीन प्रकल्पाच्या उपयोगात आणली जाणार होती. एवढी कष्टाने विकसित केलेली जमीन जाणार याचे मोठे दुःख तीनही बंधूंना होते. सरकारी यंत्रणा खरोखरच पैसे लगेच देते का, हे पाहण्यासाठी माझ्या वाट्याची ३९ आर आकाराची जमीन मी सर्वप्रथम दिली, असे परशराम सांगतात. त्याचे पैसे दोन दिवसांत मिळाले, त्यामुळे खात्री पटली आणि ते सहा एकर जमीन प्रकल्पाला देण्यास तयार झाले. खरेदी व्यवहार झाल्यानंतर साधारणतः दोन दिवसांत बंधूंच्या खात्यात पैसे जमा झाले.

समृद्धी महामार्गात त्यांची दहापैकी सहा एकर जमीन प्रकल्पाच्या उपयोगात आणली जाणार होती. एवढी कष्टाने विकसित केलेली जमीन जाणार याचे मोठे दुःख तीनही बंधूंना होते. सरकारी यंत्रणा खरोखरच पैसे लगेच देते का, हे पाहण्यासाठी माझ्या वाट्याची ३९ आर आकाराची जमीन मी सर्वप्रथम दिली, असे परशराम सांगतात. त्याचे पैसे दोन दिवसांत मिळाले, त्यामुळे खात्री पटली आणि ते सहा एकर जमीन प्रकल्पाला देण्यास तयार झाले. खरेदी व्यवहार झाल्यानंतर साधारणतः दोन दिवसांत बंधूंच्या खात्यात पैसे जमा झाले.

पैसे बँकेत जमा होण्याच्या आधीच गेलेल्या शेतजमिनीच्या बदल्यात शेतच घ्यायचे हा त्यांचा निर्धार होता. त्या दृष्टीने मग त्यांनी शोधाशोध सुरू केली. तिघांनाही एकाच ठिकाणी जमीन मिळाली नाही. एकाला कारली गावात तर दुस-याला मुगुटपूरला मिळाली. आता त्यांच्याकडे एकूण ११ एकर शेती आहे. शेतात विहीर खोदणे, विंधण विहीर घेणे, पाइपलाइन आणणे  ही कामे आता त्यांना करायची आहेत. याचबरोबर त्यांनी ट्रॅक्टरही घेतला आहे. त्याचा वापर उद्योगासाठी केला जाणार आहे. समृद्धीच्या पैशांतून घराची बांधणीही सुरू आहे. आधी त्यांचे कुटुंब पत्र्याच्या कच्च्या घरात राहात होते. आता मात्र तिघांचेही एकत्रित घर बांधत आहोत. त्याचे बांधकाम येत्या काळात पूर्ण होणार आहे. बाजूलाच असलेला गोठाही ते आधुनिक करून घेणार आहेत. समृद्धी महामार्गामुळे सगळ्या गावाचा विकास झाला आहे. त्यामुळे शेती गेल्याचे दुःख वाटत नाही. उरलेल्या शेताला कुंपण लावून घेणार असून तिथे पारंपरिक शेती सुरूच राहील, असेही त्यांनी नमूद केले. 

वाशिमप्रमाणे इतर जिल्ह्यातील हजारो लाभार्थीही या प्रकल्पाच्या माध्यमातून आता भावी आयुष्याची सोनेरी स्वप्नपाहत आहेत. वाशिममधील लाभार्थ्यांच्या गोष्टी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=2X-8w28TZp4&t=109s

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org