समृद्ध लाभार्थ्यांची गोष्ट : बुलडाणा भाग २

१० जिल्ह्यातील जमीन धारकांनी महामंडळासोबत सरळ खरेदी व्यवहार केला.आर.टी.जी एस द्वारे पैसे बँकेतील खात्यात जमा झाल्यानंतर तो पैसा त्यांनी कुठे व कसा वापरला हे सांगणारी बुलडाण्यामधील अशाच काही समृद्ध लाभार्थ्यांची गोष्ट दोन भागात..त्यातील हा दुसरा आणि शेवटचा भाग..

बुलडाण्यामधील मेहकर तालुक्यातील चायगावमधील गजानन थोरात आणि सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगावातील शिवाजी मुंढे समृद्धी प्रकल्पातील अनेक लाभार्थ्यांपैकी दोन भूधारक लाभार्थी!

गजानन थोरात यांची पावणेतीन एकर वडिलोपार्जित शेती होती. घरात स्वतः गजाजनराव, त्यांची पत्नी व दोन मुले असे चौकोनी कुटुंब आहे. सोयाबीन, हरभरा आणि गहू ही मुख्य पिके ते घेत. समृद्धी महामार्गात शेती जाणार म्हणून थोरात सुरुवातीला भांबावलेले होते. त्यांची ७१ आर शेती महामार्गात गेली आहे. मात्र, शेतीचा मोबदला चांगला मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. पूर्वी दोन-अडीच लाख रुपयांच्य वार्षिक उत्पन्नात कुटुंबाचे भागत नसल्याने त्यांना गावातील इतर शेतक-यांकडे मजुरी करावी लागत. त्यामुळे स्वतःच्या शेतात काम नसले की मजुरीचे काम ठरलेले. मात्र जमीन व्यवहारातून पैसे मिळाल्याने गजाननरावांच्या सर्व काळज्या मिटल्या आहेत.

पैसे मिळताच त्यांनी गावानजीक एक एकर जमीन घेतली. अजून सौदा पूर्ण व्हायचा असून पैसे तसेच बँकेत असल्याचे ते नमूद करतात. नव्या शेतात विहीर खोदायची असल्याचेही थोरात म्हणाले. समृद्धी महामार्गामुळे आता परिसराचा विकास होणार आहे. त्यामुळे माझ्या शेतातून महामार्ग जाईल त्यावेळी वैयक्तिक विकास साधून घेण्याच्या आणखी संधी भविष्यात प्राप्त होणार आहेत. त्यामुळे दुस-याच्या शेतात मजुरी करावी लागणार नाही, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

गजानन थोरातांसारखीच गोष्ट आहे ती शिवाजी मुंढे यांची ! तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदखेड राजापासून काही अंतरावर असलेल्या तढेगावातील अनेकांप्रमाणे शिवाजी मुंढे यांची गावात शेती होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. दोन-सव्वादोन एकर शेतीवर भाजीपाल्याचे पीक घेणारे शिवाजी आई-वडील, पत्नी आणि दोन मुले या सहाजणांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. शेतात भाज्या पिकवायच्या आणि गावच्या मंडईत त्यांचा बाजार मांडायचा, हा त्यांचा व कुटुंबाचा ठरलेला क्रम. त्यातून मिळणारे उत्पन्नही जेमतेम. मात्र समृद्धी महामार्गासाठी त्यांच्या ६१ आर जमिनीची खरेदी झाल्यानंतर त्यांचे आयुष्यच पालटले. त्यांच्या खात्यात खरेदीनंतर पैसे जमा झाले आहेत. या पैशांतून शिवाजी यांनी गावापासून २० किमी अंतरावर असलेल्या धोत्रा गांधी येथे तब्बल साडेनऊ एकर जमीन घेतली आहे. या शेतात शिवाजी हे कापूस आणि सोयाबीन ही पिके तर घेणार आहेच शिवाय भाजीपालाही पिकवणार आहे. गावापासून २० किमी अंतरावर असलेल्या शेतीकडे लक्ष देण्यासाठी भविष्यात घर बांधण्याचा विचार असल्याचे शिवाजी मुंढे म्हणतात.

शिवाजी यांनी नव्याने घेतलेल्या साडेनऊ एकर शेतात शेततळे आहे. शिवाय ज्या ठिकाणी शेती घेतली आहे, त्या ठिकाणापासून धरण जवळच आहे. त्यामुळे तिथूनही पाणी आणता येईल त्यामुळे पाण्याची टंचाई भासणार नाही अशी आशा शिवाजी यांनी व्यक्त केली. मुलांचे शिक्षण आणि शेतीकडे लक्ष देण्यासाठी देऊळगाव हे योग्य ठिकाण असल्याचे शिवाजी यांनी सांगितले.

बुलडाण्याप्रमाणे इतर जिल्ह्यातील हजारो लाभार्थीही या प्रकल्पाच्या माध्यमातून आता भावी आयुष्याची सोनेरी स्वप्न पाहत आहेत. बुलडाण्यामधील लाभार्थ्यांच्या गोष्टी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://www.youtube.com/watch?v=5TAp_olBbp8&t=77s

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org