समृद्ध लाभार्थ्यांची गोष्ट : ठाणे

१० जिल्ह्यातील जमीन धारकांनी महामंडळासोबत सरळ खरेदी व्यवहार केला. आर.टी. जी.एस द्वारे पैसे बँकेतील खात्यात जमा झाल्यानंतर तो पैसा त्यांनी कुठे व कसा वापरला हे सांगणारी ठाण्यामधील लाभार्थ्याची गोष्ट

ठाण्यामधील कल्याण तालुक्यातील गुरवली गावातील अम्मर सादिक कुंगले हे समृद्धी प्रकल्पातील अनेक लाभार्थ्यांपैकी एक भूधारक लाभार्थी!

अम्मर यांची वडिलोपार्जित शेती होती. त्यातून मिळणारे उत्पन्नही चांगले होते. असे सर्व सुरळीत सुरु असताना त्यांची शेतजमीन समृद्धी महामार्गात जाणार असल्याचे त्यांना समजले. हे समजताच सुरुवातीला त्यांना धक्का बसला. गुरवली गावातून समृद्धी महामार्गाला प्रचंड विरोध झाला. गावातील सर्वच जणांची उपजिविका शेतीवरच चालत. अम्मरचे कुटुंबही त्यास अपवाद नव्हते. अम्मरच्या कुटुंबात आई-वडील आणि सहा भाऊ. सर्व जण शेतीच करत. त्यांच्या शेतात मुख्यतः भातशेती आणि चण्याचे पीक घेतले जात. कुंगले कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नही जवळपास दहा लाखांचे होते. त्यामुळेच महाराष्ट्र समृद्धी महामार्गात जमीन जात असल्याचे समजले, त्यावेळी सुरुवातीच्या काळात त्यांनीही प्रकल्पाला खूप विरोध केला. परंतु प्रकल्पाची माहिती जसजशी कळत गेली, तसतसा त्यांचा विरोध कमीकमी होत गेला. त्यांची एकूण ९२ गुंठे जमीन समृद्धी महामार्गात गेली. त्यांना ९२ गुंठ्याचे दोन कोटी ७५ लाख रुपये मोबदल्याच्या स्वरूपात मिळाले. त्यातून त्यांनी गावाच्या आसपास वेगवेगळ्या ठिकाणी अशी एकूण पाच एकर जमीन घेतली. गुंतवणूक म्हणून या जमिनी घेतल्याचे त्याने सांगितले. गुरवलीत शेताजवळही जमीन घेण्याचा त्यांचा इरादा आहे. खडवली स्थानकाजवळही प्लॉट घेण्याची तयारी असून त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. उरलेला पैसाही ते शेतजमीनतच गुंतवणार असल्याचे अम्मरने सांगितले. या महामार्गाच्या निर्मितीमुळे भविष्यात आम्हालाही आमचा शेतमाल मुंबईला व महाराष्ट्रात अन्यत्र जलदगतीने पाठवणे सहजशक्य होणार आहे. असा आशावाद अखेरीस ते व्यक्त करतात.

ठाण्याप्रमाणे इतर जिल्ह्यातील हजारो लाभार्थीही या प्रकल्पाच्या माध्यमातून आता भावी आयुष्याची सोनेरी स्वप्नपाहत आहेत. ठाण्यातील लाभार्थ्यांच्या गोष्टी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

  • Maharashtra State Road Development Corporation Ltd
    Napean Sea Road, Priyadarshini Park,
    Mumbai 400 036, Maharashtra, India.
  • 91 22 23685909,
    91 22 26517900,
    Fax: 91 22 26417893.
  • info@msrdc.org