समृद्ध लाभार्थ्यांची गोष्ट : जालना

१० जिल्ह्यातील जमीन धारकांनी महामंडळासोबत सरळ खरेदी व्यवहार केला. आर.टी. जी.एस द्वारे पैसे बँकेतील खात्यात जमा झाल्यानंतर तो पैसा त्यांनी कुठे व कसा वापरला हे सांगणारी जालन्यामधील श्रीमंत मदन या लाभार्थ्याची गोष्ट

जालन्यामधील बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण या गावात राहणारे श्रीमंत मदन हे समृद्धी प्रकल्पातील अनेक लाभार्थ्यांपैकी एक भूधारक लाभार्थी!

श्रीमंत मदन यांचे सहा जणांचे कुटुंब आहे. स्वतः श्रीमंत मदन, त्यांची आई, दोन मुलगे आणि दोन मुली असा परिवार. दोन्ही मुले पदवी आणि बारावीपर्यंत शिकलेली आहेत. तर मुलींची शिक्षणे सुरू आहेत. दोन्ही मुले आपल्याला शेतीत मदत करतात, असे श्रीमंतराव अभिमानाने सांगतात. श्रीमंत यांच्या मालकीची साडेतीन एकर शेती होती. कोबी, टमाटे, वांगी, भेंडी, ज्वारी, मका ही पिके ते घेत, शेती म्हणजे भाजीपाल्याचा मळाच त्यांनी फुलवला होता. भाजीपाला पिकवायचा आणि बाजारात विकायला न्यायचा हे त्यांचे ठरलेले काम ! शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालनही ते करत. शेतात विहीर होती. आणि अचानक एक दिवस त्यांना कळले की घराच्या मागेच असलेली ही शेती आणि घर हे दोन्ही समृद्धी महामार्गासाठी खरेदी करण्यात येणार आहे. श्रीमंत मदन यांची जमीन समृद्धी प्रकल्पासाठी खरेदी होण्यापूर्वी गावातील शेततळ्यासाठीसुद्धा त्यांच्या जमिनीचा काही भाग खरेदी करण्यात आला होता. त्यामुळे ते अधिक अस्वस्थ झाले. काहीही झाले तरी आपली जमीन द्यायची नाही असे श्रीमंतांसह गावक-यांनी ठरवले. मात्र, प्रकल्पाविषयी माहिती कळत गेली तसा विरोध कमी होत गेला. श्रीमंत यांची दोन एकर जमीन महामार्गाच्या कामासाठी खरेदी करण्यात आली आहे. त्या बदल्यात त्यांना चांगला मोबदला मिळाला. या पैशातून जमीन घ्यायची हे त्यांनी आधीच ठरवले होते. मिळालेल्या पैशातून त्यांनी प्रकल्पासाठी खरेदी झालेल्या जमिनीच्या दुप्पट जमिनीची खरेदी केली. या शेतात आता त्यांना डाळिंब आणि मोसंबी पिकवायची आहे. शिवाय ज्वारी- मका ही आंतरपिके घ्यायची आहेत. भाजीपाल्याचा मळा पुन्हा फुलवायचा आहे. घराचेही बांधकाम त्यांना करायचे आहे, परंतु ते गावातच करायचे, असा श्रीमंतरावांचा निर्धार आहे. समृद्धीत गेलेल्या जमिनीव्यतिरिक्त उरलेल्या जमिनीत शेती सुरूच ठेवणार असल्याचे श्रीमंत आवर्जून सांगतात.

जालन्याप्रमाणे इतर जिल्ह्यातील हजारो लाभार्थीही या प्रकल्पाच्या माध्यमातून आता भावी आयुष्याची सोनेरी स्वप्नपाहत आहेत. जालन्यामधील लाभार्थ्यांच्या गोष्टी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=NPr7h3vjALc

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

  • Maharashtra State Road Development Corporation Ltd
    Napean Sea Road, Priyadarshini Park,
    Mumbai 400 036, Maharashtra, India.
  • 91 22 23685909,
    91 22 26517900,
    Fax: 91 22 26417893.
  • info@msrdc.org