समृद्ध लाभार्थ्यांची गोष्ट : अहमदनगर

१० जिल्ह्यातील जमीन धारकांनी महामंडळासोबत सरळ खरेदी व्यवहार केला. आर.टी. जी.एस द्वारे पैसे बँकेतील खात्यात जमा झाल्यानंतर तो पैसा त्यांनी कुठे व कसा वापरला हे सांगणारी अहमदनगरमधील लाभार्थ्यांची गोष्ट

अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावातील भिमाजी होन आणि घारी गावातील नानासाहेब गायकवाड हे समृद्धी प्रकल्पातील अनेक लाभार्थ्यांपैकी दोन भूधारक लाभार्थी!

भिमाजी होन यांची एकूण एक हेक्टर ५४ आर शेती होती. भिमाजींच्या शेतात चांगली मोठ्ठी विहीर होती. बोअरिंगचे पाणीही होतं. ऊस, सोयाबीन, हरभरा, मका, गहू आदी पिके ते त्यांच्या शेतात घेत. परंतु बागायती शेती असूनही त्यातून तसे खास उत्पन्न मिळत नाही याची त्यांना राहून राहून खंत वाटत होती. भिमाजींना चार मुली, एक मुलगा असा परिवार. मुलींच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी आणि शेतीसाठी कर्ज घेतले होते मात्र त्याची परतफेड करणे अवघड वाटत होते. अशी सगळी नाकारात्मक परिस्थिती असताना अचानक एक दिवस समृद्धी महामार्गाबाबत त्यांना समजले. समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे परिसरातील शेतजमिनींचे भाव वाढले होते. यामध्ये योग्य मोबदला मिळेल याची खात्री पटल्यावर आम्ही स्वखुशीने जमीन खरेदी करून देण्याचे ठरवले. त्यांची एकूण एक हेक्टर ५४ आर शेती होती. त्यातली एक हेक्टर नऊ आर शेती समृद्धीत गेली. त्याचे ८० लाख ८६ हजार रुपये मिळाल्याचे भिमाजींनी सांगितले. समृद्धीच्या पैशांतून त्यांनी त्यांच्यावरील कर्जाची परतफेड केली आहे. मुलींची लग्ने झाल्याने ते आता चिंतेत नाहीत. मुलाचेही अलीकडेच लग्न झाले आहे. तोही नाशिकमधील एका कंपनीत कामाला आहे. शिर्डी जवळ असल्याने येथील हस्त्यालगतच्या जमिनींचे भाव एकरी कोटी रुपयांनजीक असल्याचे भिमाजी यांनी सांगितले. त्यामुळे रस्त्यालगतची जमीन सोडून थोडी आतमध्ये जवळपास तीन एकर शेतजमीन घेण्याचा त्यांचा इरादा आहे. जमिनीच्या वाढलेल्या भावांचा धुरळा थोडा खाली बसला की, त्यांना पुन्हा जोमाने सुरुवात करायची आहे. परंतु शेतजमिनीची खरेदी हेच त्यांचे लक्ष्य आहे आणि ते गाठण्यासाठी भिमाजी उत्सुक आहेत.

भिमाजी होन यांच्याप्रमाणे नानासाहेब गायकवाडांची जमीन समृद्धी प्रकल्पासाठी उपयोगात आणली जाणार आहे. नानासाहेबांची वडिलोपार्जित शेती होती.. नानासाहेबांच्या कुटुंबात आई, पत्नी व तीन अपत्ये, असा सहा जणांचा परिवार आहे. एकंदर दहा एकर शेतीत ते ऊस, कांदा, गहू, ज्वारी ही पिके घेत. ज्या पिकाला बाजारात त्या वर्षी जो भाव मिळेल, त्यानुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न ठरत. तरीही शेतीतून मिळणारे अंदाजित वार्षिक उत्पन्न अडीच-तीन लाख रुपये होते. वार्षिक उत्पन्न परवडणारे नाही म्हणून. मग पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी दुधाचा व्यवसाय सुरु केला होता. त्यांची एकूण ३१ गुंठे जमीन समृद्धी महामार्गात जाणार आहे. त्या बदल्यात नानासाहेबांना ३२ लाख ४६ हजार रुपये मोबदला मिळाला आहे. मिळालेल्या मोबदल्यातून चांगल्या ठिकाणी जमीन घेण्याचा त्यांचा इरादा पक्का आहे. सुपीक जमीन घेण्याबरोबरच पाणी मुबलक प्रमाणात असलेल्या ठिकाणालाच प्राधान्य देणार असल्याचे ते सांगतात. हवी तशी जमीन मिळत नाही तोपर्यंत मिळालेला मोबदला बँकेत ठेवण्याचा निर्णय गायकवाड यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांचे पैसे बँकेतच आहेत. ३९ गुंठ्यापैकी ३१ गुंठे जमीन प्रकल्पाला गेली असली तरी उर्वरित आठ गुंठे जमिनीत शेती करण्याचा नानासाहेबांचा निर्धार आहे.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

  • Maharashtra State Road Development Corporation Ltd
    Napean Sea Road, Priyadarshini Park,
    Mumbai 400 036, Maharashtra, India.
  • 91 22 23685909,
    91 22 26517900,
    Fax: 91 22 26417893.
  • info@msrdc.org