समृद्धी महामार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर - भाग ३

समृद्धी महामार्गाचे बांधकाम १६ विभागात चाललेले आहे. या विभागाला ‘ कंस्ट्रक्शन पॅकेज’ असे नाव दिलेले आहे. कामाच्या योग्य व्यवस्थापनासाठी आणि कामाची गती चांगली ठेवण्यासाठी ४० ते ४५ किलोमीटर लांबीचा एक, असे १६ कंस्ट्रक्शन पॅकेजेस असतील.एकूण ७०० किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गात येणारे जिल्हे, तालुके, गांवे ह्यांच्या हद्दी तसेच इतर अनेक बाबी कंस्ट्रक्शन पॅकेजेस करताना विचारात घेतलेल्या आहेत. तर अश्या १६ कंस्ट्रक्शन पॅकेजेसमध्ये समृद्धी महामार्गाचे बांधकाम कसे होईल व सद्यस्थितीत कसे चाललेले ह्याविषयी थोडक्यात माहिती या लेख मालिकेतून देण्याचा हा एक उपक्रम.

कन्स्ट्रक्शन पॅकेज ७ बद्दल माहिती

पॅकेज ७ हा बुलढाणा जिल्ह्यात चेनेज २९६.००० कि.मी. पासून चेनेज ३४७.१९० कि.मी.पर्यंत आहे . हा विभाग - बांदा गाव ते सावरगाव माळ पर्यंत आहे आणि ५१.१९० कि.मी.लांबीचा आहे. या पॅकेजचे बांधकामाचे कंत्राट मे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि .या कंपनीला देण्यात आलेले आहे. रस्त्याच्या कामासोबतच काही मोठी बांधकामे करावयाची आहेत ती खालीलप्रमाणे आहेत :-

इंटरचेंजेस ०२ नं , सर्व्हिस रोड ०५ नं एकूण लांबी ३८४३ मीटर फ्लाय ओव्हर / वायाडक्ट ०९ नं एकूण लांबी ४१४० मीटर मोठे पूल ०१ नं एकूण लांबी २४५.५२ मीटर लहान पूल १७ नं.

कन्स्ट्रक्शन पॅकेज ८ बद्दल माहिती

पॅकेज ८ हा जालना जिल्ह्यात चेनेज ३४७.७२५ कि.मी. पासून चेनेज ३९०.४४५ कि.मी.पर्यंत आहे . हा विभाग - न्हावा गाव ते गेवराई गाव पर्यंत आहे आणि ४२.७२० कि.मी.लांबीचा आहे. या पॅकेजचे बांधकामाचे कंत्राट मे. मॉन्टेकार्लो लि. ह्यांच्यासोबत आयर्न टिंगल लि. या कंपनीला देण्यात आलेले आहे. रस्त्याच्या कामासोबतच काही मोठी बांधकामे करावयाची आहेत ती खालीलप्रमाणे आहेत :-

इंटरचेंजेस ०१ नं , सर्व्हिस रोड २५ नं एकूण लांबी १११३६ मीटर फ्लाय ओव्हर / वायाडक्ट ०२ नं एकूण लांबी ३६० मीटर मोठे पूल ०२ नं एकूण लांबी १७५ मीटर लहान पूल १८ नं., कॅनाल पूल २ नं. एकूण लांबी ५० मीटर

कन्स्ट्रक्शन पॅकेज ९ बद्दल माहिती

पॅकेज ९ हा औरंगाबाद जिल्ह्यात चेनेज ३९०.४४५ कि.मी. पासून चेनेज ४४४.४८५ कि.मी.पर्यंत आहे . हा विभाग - बेंडेवाडी गाव ते फातिवाबाद गाव पर्यंत आहे आणि ५४.४०० कि.मी.लांबीचा आहे. या पॅकेजचे बांधकामाचे कंत्राट मे. मेघा इंजिनीअरिंग & इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीला देण्यात आलेले आहे. रस्त्याच्या कामासोबतच काही मोठी बांधकामे करावयाची आहेत ती खालीलप्रमाणे आहेत :-

इंटरचेंजेस ०१ नं , सर्व्हिस रोड ३५ नं एकूण लांबी १८३३४ मीटर फ्लाय ओव्हर / वायाडक्ट ०३ नं एकूण लांबी ८६५ मीटर मोठे पूल ४० नं. लहान पूल १८ नं.

वरील काही मोठया बांधकाम बांधणी सोबतच रस्त्यासाठी बरीच लहान मोठी बांधकामें करावयाची आहेत.वरील कंत्राटदारांनी आपल्याला मिळालेल्या पॅकेज प्रमाणे समृद्धी महामार्गाचे काम करण्यास सुरवात केलेली आहे.

अधिक माहितीसाठी ह्या लिंकवर जा. कंस्ट्रक्शन डिटेल्स

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org