समृद्धी महामार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर - भाग १

समृद्धी महामार्गाचे बांधकाम १६ विभागात चाललेले आहे. या विभागाला ‘ कंस्ट्रक्शन पॅकेज’ असे नाव दिलेले आहे. कामाच्या योग्य व्यवस्थापनासाठी आणि कामाची गती चांगली ठेवण्यासाठी ४० ते ४५ किलोमीटर लांबीचा एक, असे १६ कंस्ट्रक्शन पॅकेजेस असतील.एकूण ७०० किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गात येणारे जिल्हे, तालुके, गांवे ह्यांच्या हद्दी तसेच इतर अनेक बाबी कंस्ट्रक्शन पॅकेजेस करताना विचारात घेतलेल्या आहेत. तर अश्या १६ कंस्ट्रक्शन पॅकेजेसमध्ये समृद्धी महामार्गाचे बांधकाम कसे होईल व सद्यस्थितीत कसे चाललेले ह्याविषयी थोडक्यात माहिती या लेख मालिकेतून देण्याचा हा एक उपक्रम.

कन्स्ट्रक्शन पॅकेज १ बद्दल माहिती

पॅकेज १ हा नागपूर जिल्ह्यात चेनेज ०.००० कि.मी. पासून चेनेज ३१.००० कि.मी.पर्यंत आहे . हा विभाग - शिवमडका गाव ते खडकी आमगाव पर्यंत आहे आणि ३१.००० कि.मी.लांबीचा आहे. या पॅकेजचे बांधकामाचे कंत्राट मे. मेघा इंजिनीअरिंग & इन्फ्रास्ट्रक्चर लि.या कंपनीला देण्यात आलेले आहे. रस्त्याच्या कामासोबतच काही मोठी बांधकामे करावयाची आहेत ती खालीलप्रमाणे आहेत :- इंटरचेंजेस ०३ नं , सर्व्हिस रोड ०७ नं एकूण लांबी १२४९० मीटर फ्लाय ओव्हर / वायाडक्ट ०४ नं एकूण लांबी ४९९ मीटर मोठे पूल ०१ नं एकूण लांबी ६७.८ मीटर लहान पूल १८ नं आणि कॅनाल पूल ०६ नं एकूण लांबी ११५ मीटर

कन्स्ट्रक्शन पॅकेज २ बद्दल माहिती

पॅकेज २ हा वर्धा जिल्ह्यात चेनेज ३१.००० कि.मी. पासून चेनेज ८९.४१३ कि.मी.पर्यंत आहे . हा विभाग - खडकी आमगाव ते पिंपळगाव पर्यंत आहे आणि ५८.४१३ कि.मी.लांबीचा आहे. या पॅकेजचे बांधकामाचे कंत्राट मे. अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लि.या कंपनीला देण्यात आलेले आहे. रस्त्याच्या कामासोबतच काही मोठी बांधकामे करावयाची आहेत ती खालीलप्रमाणे आहेत :- इंटरचेंजेस ०२ नं , सर्व्हिस रोड १२ नं एकूण लांबी ३८७५ मीटर फ्लाय ओव्हर / वायाडक्ट ०७ नं एकूण लांबी ११७० मीटर मोठे पूल ०३ नं एकूण लांबी ५८५ मीटर लहान पूल १७नं आणि कॅनाल पूल ०७ नं एकूण लांबी १९० मीटर

कन्स्ट्रक्शन पॅकेज ३ बद्दल माहिती

पॅकेज ३ हा अमरावती जिल्ह्यात चेनेज ८९.३०० कि.मी. पासून चेनेज १६२. ६६७ कि.मी.पर्यंत आहे . हा विभाग - आष्टा गाव ते वाढोणा रामनाथ गाव पर्यंत आहे आणि ७३.३६७ कि.मी.लांबीचा आहे. या पॅकेजचे बांधकामाचे कंत्राट मे. एनसीसी लि.या कंपनीला देण्यात आलेले आहे. रस्त्याच्या कामासोबतच काही मोठी बांधकामे करावयाची आहेत ती खालीलप्रमाणे आहेत :- इंटरचेंजेस ०२ नं , सर्व्हिस रोड १८ नं एकूण लांबी ५२१० मीटर फ्लाय ओव्हर / वायाडक्ट ०१ नं एकूण लांबी ४६९.५०४ मीटर मोठे पूल ०४ नं एकूण लांबी ४४८.८ मीटर लहान पूल ५०नं

वरील काही मोठया बांधकाम बांधणी सोबतच रस्त्यासाठी बरीच लहान मोठी बांधकामें करावयाची आहेत.वरील कंत्राटदारांनी आपल्याला मिळालेल्या पॅकेज प्रमाणे समृद्धी महामार्गाचे काम करण्यास सुरवात केलेली आहे.

अधिक माहितीसाठी ह्या लिंकवर जा. कंस्ट्रक्शन डिटेल्स

 

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org