समृद्धीतून होणारा बदल म्हणजे काळाची गरज !

कुठलाही सकारात्मक बदल हा काळाची गरज असतो.  महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून होणारा हा बदल लक्षात घेऊन त्याला  विरोध करणे म्हणजे निश्चितच घडणाऱ्या चांगल्या बदलांना विरोध केल्यासारखे होईल. प्रकल्पाविषयी खरी आणि अधिकृत माहिती जाणून घेतल्यानंतरच हा विरोध मावळला. प्रकल्पाच्या सुरुवातीस जो बदलास विरोध झाला त्याविषयी...

काळाप्रमाणे आपण बदललो नाही तर मागे पडण्याची भिती आपल्यापैकी प्रत्येकाला वाटते. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, त्यासाठी उभ्या कराव्या लागणाऱ्या पायाभूत सुविधा ही आजच्या काळाची गरज आहे.
भविष्यात या प्रकल्पामुळे त्यांच्या जीवनशैलीत होणारे चांगले  बदल लक्षात न घेता लोक विरोध करण्यासाठी पुढे आले.
काही भूधारक जमीन मोजणी संदर्भात आक्षेप घेत होते, काही जण प्रकल्पाच्या गरजेसंदर्भात आपली शंका उपस्थित करीत होते तर कोणी भविष्यात मिळू पाहणाऱ्या मोबदल्याविषयी साशंक होते.
मूळात काळानुसार होणारा बदल आणि त्यामुळे बदलणारे समाजाचे चित्र हे समजावून घेताना लोकांना या अशा अनेक शंका येत होत्या.  महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला विरोध म्हणजे चांगल्या बदलांना विरोध करण्यासारखेच होते.
भूधारकांची जमीन पाचपट भाव देऊन खरेदी केल्यानंतर आणि प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे यानंतर भूधारकांनी समजून घेतले. प्रकल्पामुळे होणारे चांगले बदल लक्षात आल्यानंतर आपोआपच विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा विरोध मावळला. बहुतांश शेतकऱ्यांनी आज आपल्या जमिनी खरेदी करून देऊन केवळ प्रशासनाला सहकार्य केले आहे असे नाही तर यासोबतच मिळणाऱ्या पाच पट मोबदल्यातून स्वतःच्या कुटुंबाला ही समृद्ध करण्याची स्वप्ने पाहत आहेत.
याविषयी अधिक माहिती देणारी चित्रफीत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=22-UUpLEBng&t=94s

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

  • Maharashtra State Road Development Corporation Ltd
    Napean Sea Road, Priyadarshini Park,
    Mumbai 400 036, Maharashtra, India.
  • 91 22 23685909,
    91 22 26517900,
    Fax: 91 22 26417893.
  • info@msrdc.org