शहापूर तालुक्यातील संयुक्त मोजणी सर्वेक्षण पूर्ण

शहापूर तालुक्यातील संयुक्त मोजणी सर्वेक्षण पूर्ण

मुंबई, एप्रिल १२, २०१७– ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातील संयुक्त मोजणी सर्वेक्षण (जेएमएस) पूर्ण झाल्याने राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोरसाठी (एमएससी) एक महत्वपूर्ण टप्पा पार पडला आहे. यामुळे आता थेट जमीन खरेदीला सुरुवात करता येणार आहे.

नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवेचा (एनएमएससीई) ५४ कि.मी.चा टप्पा या तालुक्यातून जातो. त्याचा जेएमएस पूर्ण झाला आहे. शहापूर तालुक्यात ५७१ हेक्टर जमीन ही एनएमएससीईच्या अंतर्गत येते. त्यापैकी २०० हेक्टर ही वनजमीन असून उर्वरित ३७१ हेक्टर जमीन ही खासगी मालकीची आहे.

खासगी मालकीच्या ३७१ हेक्टर जमिनीपैकी राज्य सरकारला १६१ हेक्टर जमिनीच्या संपादनाची संमती मिळाली आहे; तर उर्वरित २१० हेक्टर जमिनीच्या मालकांकडून संपादनासाठी संमती मिळवण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही प्रक्रिया पूर्णत्वास गेल्याबद्दल समाधान व्यक्त करताना ठाण्याच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती रेवती गायकर म्हणाल्या, ‘या प्रकल्पांतर्गत नेमकी किती जमीन येते याचा नेमका अंदाज आता आम्हाला आला आहे. यापूर्वी आमच्याकडे अंदाजित आकडेवारी होती. जमिनीच्या थेट विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार आम्ही खरेदीची प्रक्रिया सुरू करू.’

समृद्धी कॉरिडोर हा नागपूर आणि मुंबईमधला ७०२ किमी लांबीचा अतिजलद कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे आहे जो महाराष्ट्रातल्या १० जिल्हे, २४ तालुके आणि ३८५ गावांना जोडेल. या प्रक्रियेमुळे रोजगारनिर्मिती होईल, कृषीक्षेत्र आणि संबंधित उपक्रमांच्या प्रगतीला चालना मिळेल आणि जोरकस पायाभूत सुविधांचा पाया रचला जाईल ज्यामुळे ग्रामीण स्थलांतर थांबेल.

नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे हा आशियातला अतिजलद एक्स्प्रेस हायवे असेल. यामुळे नागपूर आणि मुंबईदरम्यानच्या प्रवासाचा वेळ घटून १६ तासांवरून केवळ ८ तासांवर येईल.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

  • Maharashtra State Road Development Corporation Ltd
    Napean Sea Road, Priyadarshini Park,
    Mumbai 400 036, Maharashtra, India.
  • 91 22 23685909,
    91 22 26517900,
    Fax: 91 22 26417893.
  • info@msrdc.org