वर्ध्यात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या पॅकेजची पर्यावरणीय सुनावणी

वर्ध्यात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या पॅकेजची पर्यावरणीय सुनावणी

वर्धा, मार्च २४, २०१७ : नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रसेसवेच्या (एनएमएससीई) पॅकेज १ची पर्यावरण जनसुनावणी काल इथे आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर (एमएससी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनएमएससीईचं पॅकेज १ वर्धा जिल्ह्यात नागपूर ते पिंपळगाव असं आहे.

या महाप्रकल्पाचे पर्यावरण सल्लागार श्री. नरेंद्र टोके यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितलं की पॅकेज १ मध्ये नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातल्या ५५ गावांचा समावेश असेल.

‘या पॅकेजमध्ये ४९ हेक्टर वनजमीन घेतली जाणार आहे. ३३ हेक्टर जागा ही नागपूर जिल्ह्यातली असून उर्वरित १६ हेक्टर ही वर्धा जिल्ह्यात आहे. वृक्ष लागवड, धरणं आणि कालव्यांमधल्या पाण्याचा पुरेपूर वापर, माती आणि पाण्याची चाचणी यासारखे विविध पर्यावरण संरक्षण उपाय योजण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचेल याची काळजी घेण्यात आली आहे,’ श्री. टोके म्हणाले.

‘या पॅकेजमध्ये ४९ हेक्टर वनजमीन घेतली जाणार आहे. ३३ हेक्टर जागा ही नागपूर जिल्ह्यातली असून उर्वरित १६ हेक्टर ही वर्धा जिल्ह्यात आहे. वृक्ष लागवड, धरणं आणि कालव्यांमधल्या पाण्याचा पुरेपूर वापर, माती आणि पाण्याची चाचणी यासारखे विविध पर्यावरण संरक्षण उपाय योजण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचेल याची काळजी घेण्यात आली आहे,’ श्री. टोके म्हणाले.

या प्रकल्पाला आपलं सर्वतोपरी सहकार्य देण्याचं आवाहन लोकांना करताना ते म्हणाले की हा महामार्ग बांधण्याचं मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे राज्यातल्या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणं जेणेकरून उद्योजक आणि शेतकरी जेएनपीटीशी जोडले जाऊन त्यांना फायदा होईल. यामुळे त्यांना आपली उत्पादनं मुंबईला पाठवता येतील आणि पर्यायाने त्यांची निर्यात करता येईल.

‘एकीकडे अविकसित भाग मुख्य प्रवाहाशी जोडला जात असताना या पॅकेजमुळे लोकांचा राहणीमानाचा स्तरही उंचावेल,’ श्री. टोके म्हणाले. या जनसुनावणीच्या वेळी हजर असलेल्या शेतकऱ्यांनी भूसंपादन आणि भरपाईबाबत काही शंका व्यक्त केल्या. त्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी श्री. मंगेश जोशी म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या सर्व समस्या आणि सूचनाही आम्ही लिहून घेतल्या आहेत. यावर आम्ही एक विस्तृत अहवाल बनवू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवू.’

हा एक्स्प्रेसवे म्हणजे राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून रस्त्यांची कनेक्टिव्हिटी, कृषीउद्योग यंत्रणेच्या माध्यमातून साधला जाणारा शाश्वत ग्रामीण विकास आणि बहुअंगी उपप्रकल्प यांचं एकात्मीकरण करणाऱ्या सर्वंकष प्रक्रियेतून हे साध्य केलं जाणार आहे. याद्वारे राज्याची प्रगती आणखी २० वर्षांनी पुढे जाईल. हा ७०२ किमीचा महामार्ग महाराष्ट्रातल्या १० जिल्हे, २४ तालुके, ३८५ गावांना जोडेल ज्यामुळे या दोन शहरांमधलं अंतर १६ तासांवरून थेट ८ तासांवर येईल.

या प्रक्रियेमुळे रोजगारांची निर्मिती होईल, शेती आणि त्यावर आधारित उपक्रमांचा विकास साधला जाईल आणि जोरकस पायाभूत सुविधांच्या उभारणीचा पाया घातला जाईल आणि पर्यायाने ग्रामीण भागांतून शहरांकडे होणं स्थलांतर थांबेल. नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रसेवे हा आशियातला सर्वात जलद महामार्ग असेल.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org