वर्ग २ जमिनीविषयी...

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी जमिनीची खरेदी करताना वर्ग २ च्या जमिनी विकण्यासाठी भूधारकांना काही अडचणी येत होत्या. नक्की या वर्ग २ जमिनीची विक्री करताना काय करायचे याबाबत काही शंका भूधारकांना होत्या त्याविषयी...

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी आपल्या वर्ग २ जमिनीची विक्री करताना मूळात वर्ग २ जमिनीची प्राथमिक माहिती भूधारकाला असणे गरजेचे असते. त्यामुळे सर्वप्रथम वर्ग २ जमिनीची माहिती घेऊया.

वर्ग २ जमीन म्हणजे नक्की काय ?

एखादी जमीन संबंधित जमीन मालकाला महाराजांकडून इनाम किंवा सरकरकडून बक्षिस म्हणून मिळाली असल्यास संबंधित जमिनीला वर्ग २ म्हणून संबोधण्यात येते. भूधारकाची जमीन वर्ग २ ची असल्यास ती विकताना किंवा तिचे हस्तांतरण करताना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याकडून परवानगी घेणे आवश्यक असते. तसेच विक्रीनंतर किंवा हस्तांतरणानंतर मिळालेल्या रकमेतील काही हिस्सा प्रशासन दरबारी जमा करावा लागतो.

वर्ग २ प्रकारच्या जमिनीचा व्यवहार करताना खालील गोष्टींची काळजी घेतली गेली.

 • १) महामार्गात जाणारी भूधारकाची जमीन 'वर्ग दोन' ची असल्यास सरळ खरेदीने देताना शासकीय परवानग्या घेणे आवश्यक होते यासाठी ग्रामसंवादकांनी भूधारकांना सहकार्य केले.
 • २) वर्ग दोनच्या जमिनीची सविस्तर माहिती संवादकांमार्फत भूधारकांना देण्यात आली.
 • ३) जमीन विकण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच इतर शासकीय अधिकारी यांच्याकडे परवानगी मागणेसाठीचे सर्व  पुरावे व कागदपत्रे तयार करण्यासंदर्भात प्रशासकीय मदत भूधारकांना करण्यात आली. 
 • ४) जमिनीची विक्री महामंडळास करण्यासाठी भूधारकांना शासनास काही रक्कम नजराणा स्वरूपात भरावी लागते त्यासंदर्भात भूधारकांना मार्गदर्शन करण्यात आले.

वर्ग २ जमिनीसंदर्भात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आपण चित्रफीत पाहू शकता.
https://www.youtube.com/watch?v=U741bOIdmrM&t=79s

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org