मोबदल्याचे नियोजन म्हणजे समृद्ध भविष्याची हमी

महाराष्ट्र समृद्धी महामार्गातील आर.ओ. डब्ल्यू अंतर्गत ज्या भूधारकांच्या जमिनी उपयोगात येणार आहेत अशा लाभार्थ्यांना पैशाच्या योग्य गुंतवणुकीचे पर्याय व विनियोगासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याविषयी...

महाराष्ट्र समृद्धी महामार्गात ज्यांच्या जमिनी उपयोगात आणल्या जाणार आहेत अशा भूधारकांबरोबर जमीन व्यवहार करून आर.टी.जी. एस द्वारे संबंधितांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. असे असले तरी मिळालेला पैसा योग्य पद्धतीने कुठे आणि कसा गुंतवावा तसेच खर्च करताना त्याचा विनियोग होईल याबाबत कशी काळजी घ्यावी यासंबंधित मार्गदर्शन खालील मुद्यांच्या आधारे करण्यात आले आले आहे.

  • जवळपासच्या भागात जास्त जमीन खरेदी करू शकतात. मिळालेला मोबदला नव्या जमीन खरेदीत गुंतवून शेती व्यवसाय अधिक मोठ्या प्रमाणात करू शकतात.
  •  राष्ट्रीय बँकेत / पोस्टात विविध ठेव योजनेत सुरक्षित ठेऊ शकता. भविष्याची तजवीज म्हणून राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्टात पैसे गुंतवून भूधारक आपले भविष्य सुरक्षित ठेऊ शकतात.
  •  संयुक्त खाते उघडून ठेवी ठेऊ शकतात. आपल्या वारसांच्या शिक्षणासाठी, संसाराच्या खर्चासाठी तजवीज म्हणून बँकेत भूधारक संयुक्त खाते उघडून ठेवी ठेवू शकतात.
  • आधुनिक अवजारे, यंत्रे यामध्ये गुंतवणूक करू शकतात. नवीन शेतीविषयक अवजारे, वाहने तसेच कुटिरोद्योगाची साधने व वस्तू , यंत्रे व प्राणी यांच्या खरेदीसाठी पैशाचा विनियोग भूधारक करू शकतात.

वर नमूद केलेल्या मुद्यांचा विचार करून योग्य ठिकाणी पैसा गुंतवला जाणे महत्वाचे आहे असाच संदेश देण्याचा प्रयत्न 'समृद्धी बंगला' या चित्रफितीतून करण्यात आला आहे. संबंधित चित्रफीत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=U8g-dhts1PA&t=3s

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

  • Maharashtra State Road Development Corporation Ltd
    Napean Sea Road, Priyadarshini Park,
    Mumbai 400 036, Maharashtra, India.
  • 91 22 23685909,
    91 22 26517900,
    Fax: 91 22 26417893.
  • info@msrdc.org