महाराष्ट्र समृध्दी महामार्ग हिंगणा येथून जमीन खरेदी प्रक्रियेला सुरूवात

महाराष्ट्र समृध्दी महामार्ग हिंगणा येथून जमीन खरेदी प्रक्रियेला सुरूवात

समृध्दी महामार्गासाठी जमीन देणारे राम साहू ठरले पहिले शेतकरी

नागपूर- प्रस्तावित नागपूर-मुंबई सुपर एक्स्प्रेस हायवे ( समृध्दी महामार्ग) साठी जमीन खरेदी प्रक्रियेला गुरूवार १३ जुलैपासून सुरूवात करण्यात आली. नागपूरमधील हिंगणा तहसिल कार्यालयात जमीन विक्री नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. स्थानिक शेतकरी राम साहू हे समृध्दी महामार्गासाठी त्यांची जमीन देणारे पहिले शेतकरी ठरले. यावेळी सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुरूंदकर, नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यावेळी उपस्थित होते.

श्री. साहू हे समृध्दी महामार्गासाठी जमीन देणारे पहिले शेतकरी ठरले. त्यांच्या जमिन विक्री नोंदणी प्रक्रिया हिंगणा तहसिल कार्यालयात संपन्न झाली. यावेळी गोपाळ मिसाळ, कल्पना मिसाळ, चंदा रणवीर गायकवाड आदी सहा शेतकऱयानी देखील त्यांच्या जमिनी समृध्दी महामार्गासाठी दिल्या. त्यांचे जमीन विक्रीचे व्यवहार गुरूवारी पूर्ण करण्यात आले. त्याना समृध्दी महामार्गासाठी ठरवण्यात आलेल्या नवीन दराने लाभपरताव्याची रक्कम संबंधित लाभधारकांच्या बँक खात्यात आऱटीजीएसद्वारे लगेच हस्तांतरीत करण्यात आली.

यावेळी हिंगणा तहसिल कार्यालय परिसरात शेकडो शेतकरी जमीन विक्री नोंदणी प्रक्रिया तसेच बँक खात्यात थेट पैसे जमा होण्याची प्रक्रिया पाहायला जमले होते. नागपूर जिल्हयातून २०७ हेक्टर जागा समृध्दी महामार्गासाठी लागणार आहे. त्यापैकी हिंगणा तालुक्यातील ३.५ हेक्टर जागा महामार्गासाठी शेतकरयानी दिली, त्याना जागेचा मोबदला म्हणून रूपये २.५९ कोटीचे वाटप करण्यात आले. महामार्गासाठी जमीन खरेदीने आता वेग घेतला असून नागपूर जिल्ह्यातील ११९ शेतकऱयानी समृध्दी महामार्गासाठी त्यांची जमीन देण्याची तयारी दाखवली आहे.

यावेळी बोलताना माननीय मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नागपुर समृध्दी महामार्ग राज्याला प्रगतीकडे नेणारा प्रकल्प आहे. राज्यातील आर्थिक गुंतवणूकीला व सुबत्तेला हा महामार्ग उपयोगी ठरणारा आहे. या महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया आता इतर जिल्ह्यातही सुरू करणार असल्याचे शिंदे यानी सांगितले. पत्रकारांशी बोलताना माननीय मंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, सरकारचे सर्व शेतकरयांशी बोलणे सुरू असून सर्वाना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. राज्यातील रस्त्यांची स्थिती सुधारली तर, येथील विकास झपाट्याने होऊ शकेल. आम्हाला प्रत्येक शेतकऱयाच्या चेहऱयावर आनंद पाहायचा आहे.

किरण कुरूंदकर तसेच सचिन कुर्वे यांचीही यावेळी भाषणे झाली. समृध्दी महामार्गाच्या कामाचे त्यानी कौतुक केले.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

  • Maharashtra State Road Development Corporation Ltd
    Napean Sea Road, Priyadarshini Park,
    Mumbai 400 036, Maharashtra, India.
  • 91 22 23685909,
    91 22 26517900,
    Fax: 91 22 26417893.
  • info@msrdc.org