महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी एमएसआरडीसीकडे आले ३३ पूर्व पात्रता अर्ज

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी एमएसआरडीसीकडे आले ३३ पूर्व पात्रता अर्ज

चीन, रशिया, इटली, कोरिया, कुवैत आणि सिंगापूरच्या कंपन्या देखील उत्सुक

मुंबई, जून ८, २०१७: प्रस्तावित नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवेच्या (एनएमएससीई) बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाला (एमएसआरडीसी) ३३ कंपन्यांकडून पूर्व पात्रता अर्ज प्राप्त झाले आहेत. या ३३ कंपन्यांपैकी १७ एकल असून उर्वरित संयुक्त उपक्रम कंपन्या आहेत. एमएसआरडीसीने जानेवारी २०१७ मध्ये हे अर्ज मागवले होते.

एकूण २१ भारतीय कंपन्यांनी आपले अर्ज सादर केले आहेत. चीनमधून ४ कंपन्या, रशियामधून २, टर्कीतून २ आणि इटली, कुवैत, कोरिआ आणि सिंगापूरमधून प्रत्येकी एक पूर्व पात्रता अर्ज प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं काम कार्यक्षमपणे होण्यासाठी एमएसआरडीसीने या ७०० किमीच्या रस्त्याचे बांधकाम १६ टप्प्यांमध्ये विभाजित केलं आहे.

या प्रकल्पामच्ये उत्सुकता दाखवलेल्या भारतीय कंपन्यांमध्ये हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी, लार्सन अॅण्ड टूब्रो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, गॅमन इंडिया, अशोका बिल्डकॉन, गायत्री प्रोजेक्टस, सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर आदींचा समावेश आहे.

या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करताना एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राधेश्याम मोपलवार म्हणाले, ‘‘जागतिक दर्जाच्या कंपन्यांनी या प्रकल्पासाठी पूर्व पात्रता अर्ज सादर करणं म्हणजे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दचा त्यांचा विश्वास अधिक दृढ झाल्यासारखंच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात समृद्धी तर येणारच आहे शिवाय काही कंपन्यांच्या हितासाठी महामंडळाने विशिष्ट अटी घातल्याचे आरोप देखील आता बिनबुडाचे ठरतील.’p>

एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. किरण कुरूंदकर म्हणाले, “आम्हाला या प्रक्रियेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही सर्व अर्जाचं विश्लेषण करत आहोत आणि लवकरच वर्क ऑर्डर जाहीर करू अशी अपेक्षा आहे.” या एक्स्प्रेसवेचं बांधकाम १ ऑक्टोबर, २०१७ पासून सुरु करून ऑक्टोबर २०१९पर्यंत पूर्ण करण्याचं एमएसआरडीसीने ठरवलं आहे.

४६,००० कोटी रुपयांचा हा प्रकल्प १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडेल. रस्त्यांची कनेक्टिव्हिटी, कृषीउद्योग यंत्रणेच्या माध्यमातून साधला जाणारा शाश्वत ग्रामीण विकास आणि बहुअंगी उपप्रकल्प यांचं एकात्मीकरण करणाऱ्या सर्वंकष प्रक्रियेतून हे साध्य केलं जाणार आहे.

या प्रक्रियेमुळे रोजगारांची निर्मिती होईल, शेती आणि त्यावर आधारित उपक्रमांचा विकास साधला जाईल आणि जोरकस पायाभूत सुविधांच्या उभारणीचा पाया घातला जाईल आणि पर्यायाने ग्रामीण भागांतून शहरांकडे होणं स्थलांतर थांबेल.

ह्या ग्रीनफिल्ड प्रोजेक्टमध्ये प्रवेश नियंत्रण असेल तर त्याची रचना आणि संरेखन इण्टरनॅशनल रोड काँग्रेसच्या (आयआरसी) मानकांप्रमाणे केले गेले आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग केवळ नागपूर आणि मुंबईलाच जोडणार नाही तर या दोन शहरांमधलं सध्याचं अंतर १८ तासांवरून अर्धे होईल.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org