भाऊबंदकी टाळा.. दारी समृद्धी आणा !

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी आपली जमीन खरेदी करून देताना अनेक भूधारकांना भाऊबंदकीचा कटू अनुभव आला. एकाच कुटुंबातील कलह, वादविवाद आणि भांडणे यामुळे काही प्रकरणे थेट कोर्टापर्यंत गेली. अशावेळी महामंडळाने नियुक्त केलेल्या संवादकांनी महत्वाची भूमिका बजावून संबंधित भूधारकांना मार्गदर्शन केले. या सर्व मुद्यांचा घेतलेला आढावा.. 

जुलै २०१७ मध्ये महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उपयोगात येणाऱ्या जमिनींची जशी एकीकडे खरेदी सुरु झाली तशीच भूधारकांच्या कुटुंबातील भांडणे, वादसुद्धा हळूहळू समोर येऊ लागले. आपल्या भावाची, बहिणीची किंवा जवळच्या नातेवाईकांची जमीन महामार्गाच्या उपयोगात येणार असून त्याचा त्यांना योग्य आणि त्वरित मोबदला मिळतो आहे हे पाहून अनेक जवळच्या लोकांनी यावर आक्षेप घेतला. अनेक ठिकाणी मिळणाऱ्या मोबदल्याच्या हिस्से आणि वाट्यावरून भांडणे सुरु झाली. अशा घटना मोजक्या गावात घडत असल्या तरी हा प्रश्न सोडवणे अत्यंत गरजेचे होते. यासाठी ग्राम संवादकांनी एक पाऊल पुढे टाकत लोकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. कुटुंबातील आपसाआपसातील भांडणे मिटवून सहसंमतीदार म्हणून स्वाक्षऱ्या केल्यास फायद्याचे कसे ठरेल, हे विस्तृतपणे संवादकांनी कुटुंबियांना सांगितले. ज्या भूधारकाची जमीन खरेदी होणार आहे त्याच्या जवळच्या नात्यातील आणि सहसंमतीदार असलेल्या लोकांना खालील आवाहन करण्यात आले. - 

  • १) खरेदी व्यवहार होताना आपली कागदपत्रे घेऊन हजर राहा. 
  • २) विनाअट स्वाक्षरी करून कोर्टकचेरी टाळा.
  •  
  • ३) मोबदल्यात तुमचा हिस्सा असेल तर वाद टाळून मार्ग काढा. 

या आवाहनानंतर भूधारक आणि संबंधित नातलगांनी महामंडळाला सहकार्य करत खरेदी प्रक्रियेला चांगला प्रतिसाद दिला. 

भाऊबंदकी आणि यासारख्या मुद्यांविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  https://www.youtube.com/watch?v=vIYvfA-T-bA&t=21s

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

  • Maharashtra State Road Development Corporation Ltd
    Napean Sea Road, Priyadarshini Park,
    Mumbai 400 036, Maharashtra, India.
  • 91 22 23685909,
    91 22 26517900,
    Fax: 91 22 26417893.
  • info@msrdc.org