तुमच्या जमिनीच्या एकत्रीकरणानंतर तुम्हाला काय मिळेल ?

महाराष्ट्र संमृद्धी महामार्गाच्या जवळच कृषी संमृद्धी केंद्र हे नगर म्हणून विकसित करताना जास्त विकास साधणारा आणि दळणवळण वाढविणारा असा प्रकल्प असेल. नगर उभारण्याबरोबरच कृषिपूरक औद्योगिक प्रकल्पही या भागात नव्याने उभारले जातील .त्या भागातल्या सर्वदूर उपलब्ध होणाऱ्या सोयीच्या पायाभूत सुविधा आणि जोडणी मार्ग होणार असल्याने नवीन लहान स्वयंउद्योग आणि रोजगार संधी निर्माण होऊ शकतील . ग्रामीण भागात अकृषी उद्योग सुद्धा निर्माण होण्याची शक्यता असेल. ज्यामुळे राज्यातील सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी होईल.

जमीन एकत्रीकरणाबाबत बोलायचे झाल्यास , भूधारकांना त्यांचा मालकीहक्क एका पूर्ण विकसित व अद्ययावत सुविधा पुरविलेल्या अशा भूखंडाच्या माध्यमातून टिकवून ठेवता येईल. आधीच्या मूळ मालकीच्या जमिनीच्या तुकड्याच्या एकूण मूल्यापेक्षा हा मिळालेला भूखंड जास्त किमती असेल. लोकांना एका गावातून मोठ्या शहरात स्थलांतराची गरज राहणार नसल्याने त्या भूधारकांच्या सामाजिक वातावरणाच्या आणि राहणीमानाच्या पद्धतीमध्ये अवास्तव बदल होणार नाहीत . पण जमीन एकत्रीकरण योजनेचे वरती सांगितल्यापेक्षाही जरा जास्तच फायदे आहेत . ते खाली मांडलेले आहेत

१. जमीन एकत्रीकरणानंतर, मूळ भूधारकाला त्याच्या एकत्रीकरणातील जमिनीच्या बदल्यात जास्तीत जास्त ३० % इतका विकसित बिनशेती भूखंड कृषी समृद्धी केंद्रात मिळेल.

२. कृषी समृद्धी केंद्रात भूधारकाला सर्व सोयीसुविधा वापरता येतील. ज्यात पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते , फूटपाथ ,मोकळ्या जागा , वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा उपलब्ध होईल. तर दुसरीकडे अद्ययावत सुविधा म्हणजे बगीचे व खेळाची मैदाने , सुसज्ज इस्पितळे, बँक ,शाळा, कॉलेज इ.

३. भूधारकाला त्याच्या भूखंडाची पूर्ण मालकी असल्याने ते तो भूखंड प्रकल्प पूर्ण विकसित झाल्यावर त्यांना वाटल्यास विकू शकतील . त्यात त्यांच्याजवळ बाहेरच्या बाजारात किंवा शासनाला त्याच्या पुनर्खरेदीच्या ठरविलेल्या किमतीनुसार विकू शकण्याचे पर्याय असतील.

४. स्वतःला आणि इतर लोकांना रोजगार /नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय या केंद्रात उभारता येईल जसे कृषी माळ प्रक्रिया केंद्र , शीत गृहे .गोदामे, माल वाहन व्यवसाय, पशुचिकित्सा केंद्र , शेतीपूरक व्यवसायाला बरकत मिळेल , उत्पादक आणि ग्राहक ही साखळी तयार होईल.स्थावर मालमत्तेच्या बाजारामध्ये वाढ होईल.

५. भूधारकाला विकसित भूखंड महामार्गाजवळ मिळालेला असल्याने त्याचे मोठ्या शहरांशी चांगले दळणवळण निर्माण होईल.

६. ही नवनगरे तेथील जिल्हा आणि आजूबाजूच्या भागातील लोकांकरतासुद्धा पुष्कळ संधी निर्माण करेल ,ज्यामुळे त्यांच्या एकूणच विकासाला चालना मिळेल आणि सक्तीचे स्थलांतर कमी होईल.

७.आरोग्य, शिक्षण, व्यापार, घरकुले, आणि आरामदायी पर्याय यांना हे केंद्र मोठ्या प्रमाणात आधार देतील . त्यामुळे जिल्ह्यातील लोकांच्या जगण्याच्या शैलीत सुधारणा होईल.

८.नवनगरात येणाऱ्या जाणाऱ्यांना जवळपासची यात्रा सहलीची ठिकाणे ,तसेच महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यातील इतर ठिकाणी अधिक चांगल्या मार्गाची उपलब्धी असेल. प्रवास सुरक्षित आणि गतिमान होईल. 

९.शेतीमाल.नाशवंत माल ,डेअरी माल यांना जलद, चांगल्या दर्जाच्या रस्त्याची जोडणी उपलब्ध असेल. अशा प्रदेशात अशी दळण वळणाची सोय, अद्ययावत पायाभूत सुविधा आणि परिपूर्ण सोयी होतील आणि त्यांचा परिणाम उद्योगधंदे वाढण्यात होईल.

१०. या कृषी समृद्धी केंद्रात २०००० ते २५००० लोकांना रोजगार मिळेल असा अंदाज आहे .

म्हणूनच , सफल आयुष्याकरता ही एक वेळच करावयाची गुंतवणूक असणार आहे.विश्वासाने या नवनगरांच्या मोठ्या प्रकल्पात सहभागी व्हा , कारण फक्त भूधारकांच्या फायद्यासाठीच शासनाने हातात घेतलेली आहे.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org