जमीन एकत्रीकरण योजना कशी राबविली जाते

जमिनीचे एकत्रीकरण म्हणजे फक्त जमीन देणे आणि घेणे प्रक्रिया नाही .त्यात अजून काही गोष्टी आहेत . जमिनीच्या तुकड्याचे मूल्य काढतांना फक्त त्याच्या सीमा बघणे इथपर्यंत थांबता येत नाही. एखादयाने विचारात घेणे गरजेचे असते की त्या जमिनीसोबत इतरही काही बाबीं येतात . ज्याला आपण स्थावर गोष्टी म्हणतो . या स्थावर गोष्टींमध्ये विहीर , पाईप लाईन, ड्रीप इरिगेशन संच , उत्पन्न देणारी वाढवलेली झाडे ,बांधलेली शेड व गोठे अश्या बऱ्याच गोष्टी येतात. जमीन आणि त्यावर उत्पन्न वाढविण्यासाठी केलेली कायम गुंतवणूक ही ठरविणे गरजेचे आहे.अशा पद्धतीत आपल्याला म्हणता येईल की, योग्य मूल्यमापन होते आहे.अशाने भूधारकालासुद्धा जमीन एकत्रित करतांना त्याची योग्य किंमत काढून मिळालेली असेल. शासनाने नियुक्त केलेले सक्षम प्राधिकारी जमिनीचे मूल्यांकन आणि इतर परतावा निश्चित करतील आणि भूधारक त्यांच्याबरोबर असतील.

भूधारकाच्या जमिनीच्या मालकीहक्काच्या प्रकारानुसार त्याच्या जमिनीच्या किती टक्के भूखंड मिळेल ते ठरेल

वार्षिक पिक अनुदान
कृषी समृद्धी केंद्र उभारण्याच्या काळामध्ये भूधारकाचे त्याच्या शेतीपासून मिळत असलेले उत्पन्न बुडणार असल्याने त्याला १० वर्षे भरपाई रक्कम ही वार्षिक पिक अनुदान स्वरूपात दिली जाईल. भूधारकाला जिरायती जमिनीसाठी एकरी ३०००० रुपये , हंगामी बागायती जमिनीसाठी ४५००० रु , बागायती जमिनीसाठी ६०००० रुपये मिळतील . महागाई वाढ लक्षात घेऊन दरवर्षी १० % वाढीने असे १० वर्षे मिळणारे असतील.

भूखंडाची १० वर्षांनंतरची हमी किंमत कशी काढायची याचे उदाहरण
समजा, मौजे घायगाव येथील १.०० हे. आर.(१०००० चौ. मी.) भोगवटादार वर्ग - १ ची जमीन नवनगरासाठी जमीन एकत्रीकरण योजनेद्वारे भूसंपादन करण्यास महामंडळाकडे सुपूर्द केली तर , संबंधित भूधारकास ३००० चौ. मी. चा विकसित भूखंड नवनगरात मिळेल. नवीन भूसंपादन कायद्यानुसार होणारे मुल्य खालीलप्रमाणे आहे , बिनशेती भूखंडाचा दर : रु. ९०० प्रती चौ. मी. ( शीघ्र सिद्ध गणकानुसार ) भूखंडाचे मुल्य : ३००० x ९०० = २७००००० /- भूखंडाचे भूसंपादन गुणांकानुसार होणारे मुल्य = २७००००० x २ = ५४००००० /- दिलासा रक्कम समाविष्ट करून होणारे मुल्य = ५४००००० + ५४००००० = १०८००००० /- नवीन भूसंपादन कायद्यानुसार देय आज रोजीचा मोबदला = रु. १०८००००० /- या मोबदल्यावर द.सा.द.शे. रुपये ९ % दराने सरळ व्याजानुसार १० वर्षांनंतर होणारे भूखंडमुल्य = १०८००००० + ( १०८००००० x ९ x १०/१०० )= १०८००००० + ९७२०००० = २,०५, २० , ००० /-

१० वर्षांनंतर वरील अपेक्षित किंमत न मिळाल्यास भूधारकाच्या विनंतीनुसार शासन वरील किंमत देऊन भूखंड परत घेईल

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org