गतिमान विकासातून समृद्धीकडे

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाद्वारे राज्यातील शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. वेगवेगळ्या दृष्टीकोनातून प्रस्तावित समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये सांगता येतील. नवे तंत्रज्ञान आत्मसात करून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. नवा महामार्ग बांधायचा म्हणजे केवळ रस्ता बांधून पूर्ण करायचा एवढेच ध्येय महामंडळाने ठेवले नसून छोटे-मोठे पूल, उड्डाणपूल, बोगदे बांधून अधिकाधिक प्रवाशांना सुरक्षित, सुखकर आणि वेगवान प्रवास कसा करता येईल ? यासंबंधी अनेक महत्वपूर्ण निर्णय महामंडळाच्या स्तरावर घेतले जात आहेत. या महामार्गावर बांधण्यात येणाऱ्या अशाच काही structures बद्दल अधिक जाणून घेऊया या ब्लॉगमधून..

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे आरेखन पूर्ण करून प्रत्यक्ष काम चालू करण्यापूर्वी हा महामार्ग ज्या भागातून जाणार त्या भागाचा सखोल अभ्यास संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांमार्फत केला जातो. महामार्ग बांधायचा म्हणजे केवळ रस्ता तर बांधायचा असतो ? असे अनेकांना वाटते मात्र प्रत्यक्षात महामार्ग बांधण्याआधी त्यात येणारे विविध नैसर्गिक अडथळे जसे की, नदी, दरी, अभयारण्ये, मोठे डोंगर यांना पार करून महामार्ग कसा बांधता येईल यासारख्या विविध मुद्यांचा विचार प्रशासन स्तरावर केला जातो. मार्गात येणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करून त्यांचे संवर्धन होईल याप्रकारे हे मुद्दे अभ्यासून त्यावर अभियंते पूल, उड्डाणपूल, बोगदे बांधण्याचा पर्याय कुठे आणि कसा वापरता येईल याचा ही अभ्यास करतात. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विचार केला तर हा सर्व अभ्यास प्रशासनाने यापूर्वीच केलेला आहे आणि त्याप्रमाणे योग्य आणि आवश्यक ठिकाणी पूल, उड्डाणपूल, बोगदे बांधले जाणार आहेत.

पॅकेज १ चा विचार केला तर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात धामनाडी-अकावी दरम्यान तीन, सुकळी-वायफळ दरम्यान दोन, खापोरी-बोरगाव, बोरगाव-खैरी खुर्द, खैरी खुर्द ते घोडेघाट, हळदगाव-वडगाव, किन्हाळा-इटाळा, गंगापूर-कोटंबा आणि निजामपूर-पिंपळगाव दरम्यान प्रत्येकी एक पूल बांधण्यात येणार आहे. तसेच इटाळा- येला दरम्यान नदीवरून ही एक पूल आणि एक व्हायाडक्ट बांधण्याचा प्रस्ताव आहे. गंगापूर-कोटंबा दरम्यानसुद्धा दोन व्हायाडक्ट आणि एक पूल बांधण्याचे नियोजन आहे.

पॅकेज २ मध्ये अमरावती, वाशिम आणि बुलडाण्याचा विचार केला तर वाघजाई-पिंपळखुटा दरम्यान पाच, येडशी ते कुरुला दरम्यान चार, मांडवा ते पांगरी दरम्यान तीन, तर पळसखेड, हिवरखेड, देऊळगाव कोळ, गोक सांगवी येथे प्रत्येकी एका व्हायाडक्टचे बांधकाम नियोजित आहे. तळणी-कडशी दरम्यान नदीवर चार, गौंधला येथे दोन, तर आष्टा, पठाणपूर, जवळा, शेलू नटवा, रेगाव, हिवरखेड येथे प्रत्येकी एक पूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. यापैकी काही पूल हे नदीवर बांधण्यात येणार आहेत.

पॅकेज ३ मध्ये जालना ते औरंगाबाद दरम्यान दौलताबाद येथे दोन आणि अहंकार देऊळगाव येथे एक व्हायाडक्ट बांधण्याचे नियोजन आहे. पुलांचा विचार केला तर अहंकार देऊळगाव ते गुंडेवाडी दरम्यान चार, राजेवाडी ते बेंडेवाडी दरम्यान तीन, फतीयाबाद, लासूर गाव येथे प्रत्येकी दोन तर नाव्हा, गोपालपूर, दहेगाव आणि पिंपळगाव दरम्यान प्रत्येकी एक पूल बांधण्याचा प्रस्ताव आहे.

पॅकेज ४ मध्ये नगर-नाशिक दरम्यान नद्यांवर एकूण चार आणि उर्वरित आवश्यक ठिकाणी तीन असे एकूण सात पूल बांधण्यात येणार आहेत. पॅकेज ५ मध्ये इगतपुरी ते वडपे दरम्यान एकूण ५ बोगद्यांचे काम प्रस्तावित असून नायगाव येथे दारणा नदीवर तर शेंडे ते खुटवडी व चिराडपाडा येथे भातसा नदीवर पूल बांधण्याचे नियोजन आहे. दलखन ते रातांधळे दरम्यान तीन पुलांचे काम प्रस्तावित असून कामरा-गोलभन, खोर्डी आणि शेले येथे प्रत्येकी एका पुलाचे काम नियोजित आहे.

अशाप्रकारे विविध प्रकारचे पूल, बोगदे यांच्या माध्यमातून मुंबई नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित, वेगवान प्रवासासोबत प्रवासाचा सुखकर अनुभव मिळवून देण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. एवढेच नव्हे तर पूल, बोगदे, व्हायाडक्टच्या माध्यमातून नैसर्गिक सधनसंपत्तीला धोका निर्माण होणार नाही याची ही खबरदारी यानिमित्ताने घेतली जात आहे हे विशेष !

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org