कृषी समृद्धी केंद्राविषयी सगळं माहिती व्हावे म्हणून ..... भाग १

नवनगरे विकास प्रकल्प अर्थात कृषी समृद्धी केंद्र निर्माण करण्याचे कामासाठी एमएसआरडीसी ला "कृषी समृद्धी केंद्र विकास प्राधिकरण " म्हणून संपूर्ण अधिकार मिळालेले आहेत.फक्त नवनगरे निर्माण करणे नसून त्याबरोबरच महाराष्ट्रातल्या १० जिल्ह्यांचा आणि १४ लगतच्या जिल्ह्यांचा विकास करणे हा उद्देश ठेवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाबरोबरच हा प्रकल्प प्रस्तावित केला गेला असल्याने आधीपासूनच सुनियंत्रित आणि पद्धतशीर विकास होत जाणार आहे , खासकरून इंटरचेंजेसच्या आसपासच्या भागात.

या प्रकल्पात वीसहून अधिक कृषी समृद्धी केंद्र अगदी मोक्याच्या ठिकाणी तयार केली जाणार आहेत. ही नवनगरे कमीत कमी ३० कि मी अंतरावर व समृद्धी महामार्गाला जिथे राज्य वा राष्ट्रीय महामार्ग छेदून जात असतील त्याच्या जवळपासच असतील . प्रत्येक नगराचा आकार साधारण १००० ते १२०० एकर इतका असणार आहे. केंद्रामध्ये शेतीवर आधारित अन्न व फळ प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य असेल आणि त्याशिवाय तिथे अन्य उत्पादन आणि व्यापार केंद्रही असेल. याबरोबरच इथे सर्व मूलभूत सोयीसुविधांसकट रहिवासी क्षेत्र देखील असेल.आधुनिक नगररचनेच्या नियमांनुसार इथले जमीन वापराचे प्रमाण ठरविले जाईल. जमिनीचा अर्धा भाग हा निवासी क्षेत्रासाठी राखीव असेल, १५% भाग हा औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव असेल, तर २०% भाग हा अंतर्गत रस्त्यांसाठी राखीव असेल. याबरोबरच १०% भाग हरितक्षेत्र म्हणून राखीव ठेवला जाईल आणि ५% भाग हा सार्वजनिक आणि त्यासारख्या वापरासाठी ठेवलेला असेल.

प्रत्येक नगराची रचना ही त्या त्या परिसराच्या वैशिष्टयांनुसार केलेली असेल, जेणेकरून ते नगर त्या परिसराची ओळख जपेल आणि वाढवेलही. त्यामुळेच इथल्या प्रत्येक नगराची स्वतःची वेगळी अशी ओळख असेल जी स्थानिक गरजा व भौगोलिक परिस्थितीनुसार बनलेल्या असेल.

प्रत्येक कृषी समृद्धी केंद्र, त्या त्या भागात व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करेल. यामुळे विकासाला चालना मिळेल आणि विविध प्रकारच्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यामुळे स्थानिकांना कौशल्य विकासाची संधी मिळेल. यामुळे नोकरी आणि व्यवसायाच्या विविध संधी निर्माण होतील व ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर थांबवता येईल.१० वर्षांमध्ये तयार होणाऱ्या ह्या प्रकल्पामुळे
प्रत्येक कृषी समृद्धी केंद्रांच्या स्थानिक रस्त्यांच्या जाळ्यातही सुधारणा होईल. नगरे ही एकमेकांशी आणि या महामार्गाशी जोडली जातील. आजूबाजूच्या भागांमधून या महामार्गापर्यंत पोहचण्यासाठी जोड रस्ते बांधण्यात येतील आणि मुख्य रस्ते देखील सुधारण्यात येतील. विकास आणि प्रगती ही केवळ या केंद्रांपर्यंत मर्यादित न राहता, ती आजूबाजूच्या भागांतही पोहचेल.

त्यामुळे , "कृषी समृद्धी केंद्र" हा फक्त महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बरोबरीने होत असलेला नवीन नगर विकसित करण्याचा केवळ एक प्रकल्प म्हणून न राहता, जिथे कालांतराने त्याच्या आतला आणि आजूबाजूच्या परिसरातला विकास नक्की घडेल ,अशा चांगल्या भविष्यावर सकारात्मक प्रकाश टाकतो आहे.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org