एमएसआरडीसीने महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी मागवले पात्रता प्रस्ताव

एमएसआरडीसीने महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी मागवले पात्रता प्रस्ताव

नागपूर, मार्च १, २०१७ : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (एमएससी) या प्रकल्पाला गती मिळण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) काल पर्यावरणावरची पहिली जाहीर सुनावणी आयोजित केली होती.

मुंबई, जानेवारी ०३, २०१७: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या नावाने अधिक लोकप्रिय असणाऱ्या मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवेसाठी जागतिक पातळीवरच्या बड्या बांधकाम कंपन्यांकडून पात्रता प्रस्ताव मागवले आहेत.

या प्रकल्पाची अंदाजित किंमत ४६,००० कोटी रुपये असून त्यामध्ये कृषी विकास केंद्रं म्हणून महामार्गालगत नवीन शहरांचा विकास करण्याचा खर्चही अंतर्भूत आहे.

हे पात्रता प्रस्ताव १६ पॅकेजेससाठी ईपीसी मोडवर मागवण्यात आले आहेत. हा प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ​सिव्हिल वर्क्ससाठी लागणारा खर्च, ज्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत, तो २७,६५० कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये २४,००० कोटी रुपये इतका नोडच्या विकासाचा आणि ५०० कोटी रु. इतका उपयोगिता स्थानांतरणाचा अंदाजित खर्च अंतर्भूत आहे. या प्रकल्पातली जमिनीची किंमत १३,००० कोटी रुपये इतकी अंदाजित आहे.

‘राज्यभरातल्या सर्व संबंधित जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता, एकत्रित मापन सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की प्रकल्पाला आवश्यक त्या सर्व मंजुऱ्याही मिळतील. आमची अशी इच्छा आहे की या प्रकल्पामध्ये जगभरातल्या बांधकाम क्षेत्रातल्या दर्जेदार कंपन्यांनी सहभागी व्हावं. पात्रता प्रस्तावांना चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे,’ असं मत एमएसआरडीसीचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी व्यक्त केलं.

सरकारने लॅण्ड-पूलिंग पद्धतीचा अवलंब केला असून त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार आहे, त्यांना नवीन शहरांमध्ये विकसित जमीन दिली जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या कृषी नुकसानाचीही भरपाई केली जाणार आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ७०६ कि.मी.चा. चा सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे असून तो नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधून जाणार आहे. तो महाराष्ट्रातल्या १० महत्त्वपूर्ण जिल्हे, २७ तालुके आणि ३८५ गावांना जोडणार आहे जेणेकरून राज्याची पूर्व-पश्चिम टोकं जुळतील.

या दुव्यामुळे प्रवासाच्या वेळेत निम्म्याने बचत होणार आहे. त्यामुळे एकूण प्रवासाचा वेळ अवघ्या ८ तासांचा असेल. ३४ ग्रामीण जिल्ह्यांपैकी २४ जिल्हे या महामार्गाला जोडले जाणार आहे.

समृद्धी महामार्ग हा अखेरीस सुवर्ण चौकोन आणि पश्चिम महामार्गाला जोडला जाईल ज्यामुळे संपूर्ण राज्यात सहजगत्या संचार करता येईल.

महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधांमधला एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिल्या जात असलेल्या या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या विकास टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग अपेक्षित आहे. या विकासाची फळं अल्पकालीन नसून तो शाश्वत विकासाचा पाया असेल ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषीउद्योगांना चालना मिळेल.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org