उधळपट्टीतून होणारे नुकसान टाळा अन समृद्ध व्हा !

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पादरम्यान ज्यांच्या जमिनी उपयोगात आणल्या जाणार आहेत अशा भूधारकांना योग्य मोबदला देण्याचे काम एकीकडे सुरु असताना दुसरीकडे मिळालेला मोबदला कुठे गुंतवू नये, तो कुठे गुंतवणे धोकादायक ठरू शकते याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे त्याविषयी...

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या अंतर्गत ज्या भूधारकांना मोबदला देण्यात आला आहे त्यांनी क्षणिक सुख आणि आनंदाच्या मोहापायी चुकीच्या गोष्टींना बळी पडू नये यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मोबदल्याचा गैरवापर टाळण्यासाठी कुठल्या गोष्टी टाळायला हव्या याबाबत परस्पर संवाद साधण्यात आला. या मार्गदर्शनादरम्यान विविध मुद्यांचा उहापोह करण्यात आला. ते मुद्दे खालीलप्रमाणे -

१) जुगार, लॉटरी येथे गुंतवणूक टाळा.
कमी कालावधीत अधिक पैसे मिळतील या मोहापायी अनेक लोक हातचा पैसा जुगार आणि लॉटरी खेळताना गमावतात आणि सुखी भविष्याची माती करतात अशी अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेत. त्यामुळे पैसे लावून जुगार आणि लॉटरी खेळणे टाळावे.

२) व्यसने आणि आतबट्यांच्या व्यवहारात खर्च करणे टाळा.
व्यसने जशी आरोग्यास हानिकारक आहेत त्याप्रमाणे त्यात हातचा पैसा खर्च करणे म्हणजे स्वतःचे नुकसान करून घेण्यासारखे आहे. तसेच ज्या गोष्टींमध्ये आपल्याला गती नाही अशा गोष्टींमध्ये पडून आतबट्याचे व्यवहार करून खर्च करणे टाळा.

३) बेभरवशाचे सगेसोयरे आणि हातउसने मागणाऱ्या लोकांपासून सावध राहा.
अनेकवेळा सगेसोयरांना किंवा ओळखीच्या लोकांना आपण मदत म्हणून मोठी रक्कम हातउसने म्हणून देतो मात्र अशा व्यवहारात सतर्कता बाळगणे महत्वाचे आहे.

४) अनधिकृत आणि फसव्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक टाळा.
अनेकवेळा जास्त व्याजदराचे आमिष दाखवून काही अनधिकृत कंपन्या ग्राहकांची फसवणूक करतात अशा संस्थांमध्ये किंवा कंपनीत पैसे गुंतवणे टाळा.

वर नमूद केलेल्या मुद्यांचा विचार करून योग्य ठिकाणी पैसा गुंतवला जाणे महत्वाचे आहे असाच संदेश देण्याचा प्रयत्न 'चिमणी अन माकड' या चित्रफितीतून करण्यात आला आहे. संबंधित चित्रफीत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=mIZ6qSTNSvs&t=37s

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

  • Maharashtra State Road Development Corporation Ltd
    Napean Sea Road, Priyadarshini Park,
    Mumbai 400 036, Maharashtra, India.
  • 91 22 23685909,
    91 22 26517900,
    Fax: 91 22 26417893.
  • info@msrdc.org