इंटरचेंजेस : बदलत्या वाहतूक व्यवस्थेची गरज !

सद्यस्थितीत महामार्गांवर प्रवाशांना व नजीकच्या गावातील लोकांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे? त्यावर इंटरचेंजेसची बांधणी हा उपाय कसा ठरू शकेल ? आणि इंटरचेंजेसचा अंतर्भाव महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पात कसा करण्यात येणार आहे या सर्व मुद्यांचा हा घेतलेला आढावा.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्यातील १० जिल्ह्यातून जाणार आहे. या १० जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गामध्ये प्रवाशांना सुरळीतपणे वाहतूक करता यावी यासाठी आवश्यक ठिकाणी इंटरचेंजेसच्या माध्यमातून एंट्री व एक्झिट पॉईंट्स बांधण्यात येणार आहेत.

सद्यस्थितीचा विचार करता महामार्गवर अपवादानेच इंटरचेंजेसची बांधणी केल्याचे आढळून येईल. बहुतांश महामार्गांवर इंटरचेंजेस नसल्याने संबंधित महामार्ग हा नजीकच्या गावांशी योग्य पद्धतीने जोडला गेलेला नाही. चौफुल्यांच्या माध्यमातून जरी काही ठिकाणी गावे जोडली गेलेली असली तरी तेथे अपघात होण्याचे प्रमाण निश्चितच वाढले असल्याचे लक्षात येते. वाहतूक कोंडीही चिंतेचा विषय बनत चालली आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गांच्या माध्यमातून ग्रामीण भाग शहरांशी जोडला न गेल्याने आज ग्रामीण भागात तयार झालेला शेतमाल शहरापर्यंत वेगाने, सुरक्षितपणे आणि सोयीने पोचण्यात अनेक अडचणी येत आहेत.

यावर उपाय योजण्यासाठी वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येचा त्याचा वाहतुकीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर इंटरचेंजेसची बांधणी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासाठी अनुभवी आणि अर्हता प्राप्त कंत्राटदारांची निवड महामंडळाने यापूर्वीच केली आहे.

इंटेचेंजेसच्या बांधणीमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गात येणारे अडथळे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर उद्भवणार नाहीत. ज्यामुळे प्रवाशांच्या सोयीसह ग्रामीण भागातील लोकांना शहरी जीवनमानासोबत अंतर्मुख होऊन गावकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येणे शक्य होणार आहेत.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org